Seed Processing Workshop Agrowon
ॲग्रो विशेष

Seed Processing : बीजप्रक्रियेनंतर तूर पेरणी करावी

Tur Crop Cultivation : बाळापूर तालुक्यातील मौजे खामखेड येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विभागामार्फत खरीप तूर पीक लागवड तंत्रज्ञान या विषयावर शेतीशाळा घेण्यात आली.

Team Agrowon

Akola News : बाळापूर तालुक्यातील मौजे खामखेड येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विभागामार्फत खरीप तूर पीक लागवड तंत्रज्ञान या विषयावर शेतीशाळा घेण्यात आली.

आत्मा प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे, तालुका कृषी अधिकारी नंदकुमार माने यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम झाला.

या शेतीशाळेमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील बियाणे तंत्रज्ञान संशोधन विभागातील डॉ. गजानन लांडे, आत्मा तालुका तंत्र अधिकारी विजय शेगोकार, कृषी सहाय्यक गोपाल राऊत उपस्थित होते.

कीटकशास्त्रज्ञ डॉ. लांडे यांनी समाधानकारक पाऊस पडल्यानंतर वाफसा येताच कुळवणी करावी. त्यानंतरच योग्य ओल असताना तुरीची पेरणी करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशकाची रायझोबीयम जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करूनच पिकाची पेरणी करावी, असे आवाहन केले.

श्री. शेगोकार यांनी तूर पिकाचे लागवड तंत्र, सुधारित वाणाची निवड, बीज प्रक्रियेवर मार्गदर्शन केले. गोपाल राऊत यांनी विविध योजनांची माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update: विदर्भ, दक्षिण मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

Crop Insurance Claims: पीक विम्यासाठी शून्य उत्पादनावर आधारित पीक कापणी प्रयोग

Water Conservation: जलसंधारणाला समन्यायी पाणीवाटपाची जोड हवी

Farmers Protest: जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी हक्क मोर्चाचे हलगी बजाव आंदोलन

Livestock Management: पावसाचा खंड, जनावरांवरही ताण; कशी घ्यावी काळजी?

SCROLL FOR NEXT