Tur Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Procurement : हमीभावाने १७ हजार ७९८ क्विंटल तूर खरेदी

Tur Market : आजवर या दोन जिल्ह्यातील ४५७ शेतकऱ्यांना ४ हजार ८९४ तुरीचे ३ कोटी ६९ लाख ५७ हजार २५० रुपयाचे चुकारे अदा करण्यात आले, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी दिली.

Team Agrowon

Parbhani News : किंमत आधार योजनेअंतर्गंत परभणी व हिंगोली जिल्ह्यामध्ये हमीभावाने (प्रतिक्विंटल ७५५० रुपये) तूर विक्रीसाठी पणन महासंघ अंतर्गंत ३३ केंद्रावर ३ हजार ४४२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. शुक्रवार (ता. ९) पर्यंत १५ केंद्रांवर ९८९ शेतकऱ्यांची १७ हजार ७९८ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.

आजवर या दोन जिल्ह्यातील ४५७ शेतकऱ्यांना ४ हजार ८९४ तुरीचे ३ कोटी ६९ लाख ५७ हजार २५० रुपयाचे चुकारे अदा करण्यात आले, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी दिली.

परभणी जिल्ह्यात केंद्रीय नोडल एजन्सी नाफेडच्या (राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ) वतीने हमीभावाने तूर खरेदी करिता राज्य सहकरी पणन महासंघ अंतर्गंतच्या परभणी, पेडगाव, झरी, वरपुड, जिंतूर, बोरी, भोगाव, सेलू, मानवत, रुढीपाटी, पाथरी, देवनांदरा, सोनपेठ, पालम, चाटोरी, पूर्णा, एरंडेश्वर, ताडकळस या १८ केंद्रावर ऑनलाईन नोंदणी केलेल्या १ हजार ९९१ पैकी १ हजार९०९ शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर तूर घेऊन येण्यासाठी एसएमएस (संदेश) पाठविण्यात आले.

शुक्रवार (ता.९)पर्यंत पेडगाव, बोरी, भोगाव, सेलू, रुढी पाटी, देवनांद्रा, एरंडेश्वर, ताडकळस या ८ केंद्रावर ५६१ शेतकऱ्यांची ९ हजार १०० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. या तुरीची किंमत ६ कोटी ५२ लाख १६ हजार ९०० रुपये होते.हिंगोली जिल्ह्यात केंद्रीय नोडल एजन्सी एनसीसीएफच्या (राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ) वतीने तूर खरेदी करिता राज्य सहकारी पणन महासंघ अंतर्गंत हिंगोली, कन्हेरगाव, कळमनुरी, वारंगा, वसमत, जवळा बाजार, येळेगाव, सेनगाव, साखरा, शिवणी खुर्द, फाळेगाव, नागासिनगी, आडगाव, उमरा, पुसेगाव या १५ केंद्रांवर ऑनलाइन नोंदणी केलेल्या २ हजार ७९९ पैकी २ हजार ३१० शेतकऱ्यांना खरेदी केंद्रांवर तूर घेऊन येण्यासाठी एसएमएस (संदेश) पाठविण्यात आले.

शुक्रवार (ता. ९) पर्यंत हिंगोली, कनेरगाव, फाळेगाव, सेनगाव, नागसिनगी, जवळा बाजार, आडगाव या ७ केंद्रांवर ४२८ शेतकऱ्यांची ८ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. या तुरीची किंमत ६ कोटी ५६ लाख ६९ हजार रुपये होते.

तीन कोटींवर चुकारे अदा....

परभणीत तूर विक्री केलेल्यांपैकी ३९८ शेतकऱ्यांना ३ क्विंटल ८८२ तुरीचे २ कोटी ९३ लाख १२ हजार ८७५ रुपये एवढ्या चुकारे अदा करण्यात आले आहेत. हिंगोली जिल्ह्यात तुरीचे ७६ लाख ४४ हजार ३७५ रुपये चुकारे अदा करण्यात आले आहेत असे सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT