Tur Rate  Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Market Rate : विदर्भात तूर ११ हजार रुपयांवर

Tur Rate Update : तेजी कायम; सोयाबीन, चणा दर हमीदरापेक्षा कमी

Team Agrowon

Nagpur Tur Market Rate: गेल्या हंगामात हमीभावाचा टप्पाही न गाठणाऱ्या तुरीच्या दराने यंदा मात्र चांगलाच भाव खाल्ला आहे. त्याचवेळी सोयाबीन व चण्याचे दर मात्र घसरणीला लागले आहेत.

दोन्ही पिकांचे दर आता वधारण्याची शक्यता मावळली असल्याचे जाणकारांचे मत आहे.

चालू हंगामात तुरीच्या दरांमध्ये सुरुवातीपासूनच तेजी राहिली आहे. देशांतर्गत घटलेले उत्पादन, मर्यादित आयात आणि चांगला उठाव यामुळे तुरीला चढे दर मिळाले आहेत.

हे दर वाढतच आहेत. तुरीच्या दराने बुधवारी (ता. ३१) अमरावती बाजार समितीत १० हजारांचा टप्पा गाठला, तर अकोला आणि वाशीम जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीत केवळ २६ क्विंटल तुरीला ११६५ रुपयांचा दर मिळाला.

चालू हंगामातील तूर बाजारात आली तेव्हा दर तेजीत होते. नवी तूर हाती येण्याच्या आधीच यंदा देशातील उत्पादन कमी असल्याचे स्पष्ट झाले होते. गेल्या हंगामात तुरीला कमी भाव मिळाला होता. त्यामुळे गत हंगामात पेरणी क्षेत्र कमी झाले.

२०२२-२३ च्या हंगामात तुरीला ६६०० रुपये हमीदर जाहीर झाला. या हंगामातील नवीन तूर बाजारात येण्याच्या दोन महिन्यांपूर्वीच तुरीने हमीभावाचा टप्पा ओलांडला. तुरीची आवक वाढल्यानंतरही भाव कमी झाले नाहीत. आणखी काही काळ तुरीचे दर तेजीतच राहतील, असे खरेदीदार राजेश पाटील यांनी सांगितले.


बुधवारी (ता. ३१ मे) अमरावती बाजार समितीत १०२५, तर वाशीम जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीत अवघ्या एक क्विंटल तुरीला ११ हजार रुपये तर अकोला बाजार समितीत २५ क्विंटलला ११ हजार ६५ रुपयांचा दर मिळाला.

सोयाबीन, चण्याचे दर घसरले
या हंगामात सोयाबीन व चण्याचे दर प्रारंभीपासूनच दबावात राहिले आहेत. सोयाबीनला सुरूवातीला साडेपाच ते सहा हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

भाव वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी आवक रोखून धरली खरी मात्र भाव चढले नाहीत. उलट त्यामध्ये सातत्याने घसरणच दिसून येऊ लागली आहे.

सध्या स्थानिक बाजारात सोयाबीनला ४७५० ते ४८८१ रुपये दर आहे. चण्याला सध्या ४४५० ते ४६५० रुपये दर आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

SCROLL FOR NEXT