Crop System  Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Crop : तूर पिकाचा पीक पद्धतीत समावेश असावा

Dr Pawar : डॉ. पवार म्हणाले, की मागील दोन वर्षांपासून तूर पिकास मिळणारे भाव, जमिनीची सुपीकता, इतर पिकांच्या तुलनेत व्यवस्थापन खर्च कमी या बाबी विचारात घेतल्या तर या पिकास मोठी संधी आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : जिल्ह्यात प्रामुख्याने कापूस आणि मका या दोन पिकांस शेतकरी पसंती देतात. ही दोन पिके सातत्याने घेतल्याने कीड व रोगाचे प्रमाण वाढत आहे. या पिकास पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी आता तूर पिकाकडे लक्ष देणे गरजेचे, असल्याचे मत विस्तार कृषी विद्यावेता डॉ. सूर्यकांत पवार यांनी व्यक्त केले.

विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र आणि कृषी विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून डिसेंबर महिन्याचे मासिक चर्चासत्र व क्षेत्रीय भेट नुकतीच आयोजित केली होती. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख उपविभागीय कृषी अधिकारी धनश्री जाधव, सुभाष आघाव, डॉ. दिलीप हिंगोले, डॉ. संजुला भावर आदी उपस्थित होते.

डॉ. पवार म्हणाले, की मागील दोन वर्षांपासून तूर पिकास मिळणारे भाव, जमिनीची सुपीकता, इतर पिकांच्या तुलनेत व्यवस्थापन खर्च कमी या बाबी विचारात घेतल्या तर या पिकास मोठी संधी आहे. बी. डी. एन ७११ आणि गोदावरी हे वाण शेतकऱ्याच्या शेतात उत्तम उत्पादन देत आहे.

याच गावातील शेतकरी उत्पादक कंपनी, विलास गवळी यांच्या कांदा व टोमॅटो ड्रायर युनिटची पाहणी केली. सिल्लेगाव येथील अरविंद नरोडे यांच्या जिरेनियम लागवड व प्रक्रिया युनिट याची पाहणी केली.

यानंतर सचिन मुळे यांच्या दूध प्रक्रिया उद्योगास भेट दिली. क्षेत्रीय पाहणीत आलेल्या समस्या आणि रब्बी हरभरा कांदा व मोसंबी आंबे बहर नियोजन यावर डॉ. दिलीप हिंगोले आणि डॉ. संजूला भावर यांनी मार्गदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT