Ravikant Tupkar Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : पीकविम्यासाठी तुपकरांची कृषी कार्यालयात धडक

Ravikant Tupkar : गेल्या वर्षीच्या पीकविम्यापासून वंचित असलेल्या पात्र-अपात्र शेतकऱ्यांना तातडीने पिकविमा द्यावा, या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेते संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सोमवारी (ता. २) जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात शेतकऱ्यांसह धडक दिली.

 गोपाल हागे

Buldana News : गेल्या वर्षीच्या पीकविम्यापासून वंचित असलेल्या पात्र-अपात्र शेतकऱ्यांना तातडीने पिकविमा द्यावा, या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेते संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सोमवारी (ता. २) जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात शेतकऱ्यांसह धडक दिली.

बुलडाणा जिल्ह्यात AIC पीकविमा कंपनीने गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामातील पोस्ट हार्वेस्टिंगअंतर्गत पात्र असलेल्या व चुकीचे कारण दाखवून अपात्र केलेल्या एक लाख २६ हजार २६९ शेतकऱ्यांना अद्याप पीकविम्याचा मोबदला दिला नाही. त्याचबरोबर खरीप हंगामात चुकीची कारणे देऊन अपात्र केलेल्या ७० हजार ८३१ शेतकऱ्यांना पीकविमा देण्याचे कंपनीने मान्य केले आहे.

‘त्या’ शेतकऱ्यांनाही कंपनीने अद्याप पीकविम्याचा मोबदला दिला नाही. पीकविम्यापोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २३५ कोटी ५५ लाख रुपये रक्कम मिळणे अद्याप बाकी आहे. तातडीने ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी, अशी आमची मागणी आहे.

परंतु शासनाकडून उर्वरित हिस्सा मिळाल्यानंतरच या वंचित शेतकऱ्यांची पीकविमा रक्कम जमा करू, असे कंपनीकडून सांगितले जात आहे. त्यामुळे तातडीने शासन स्तरावर पाठपुरावा करून वंचित शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करावी, अशी मागणी तुपकर यांनी जिल्हा कृषी अधीक्षक मनोज ढगे यांच्याकडे केली.

आचारसंहितेमुळे आम्ही शांत होतो, आता आचारसंहिता संपली आहे, त्यामुळे येत्या आठ दिवसांत वंचित पात्र-अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविमा जमा करा, अन्यथ आक्रमक आंदोलन करणार असल्याचा इशारा तुपकर यांनी दिला.

या वेळी विनायक सरनाईक, नितीन राजपूत, आकाश माळोदे, अमोल मोरे, रामेश्वर अंभोरे, गजाननबाप्पू देशमूख, राहुल शेलार, महेंद जाधव, उमेशसिंग राजपूत, सदाशिव जाधव, भागवत धोरण, विजय बोराडे, गजानन कुटे, सतीश सुरडकर, संतोष शेळके यांच्यासह क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Dharwad Method: तूर लागवडीची धारवाड पद्धत, हेक्टरी उत्पादन थेट २५-२६ क्विंटलपर्यंत!

Inspirational Story: गावाच्या पाणी प्रश्‍नासाठी झगडणारा सुनील

Crop Damage Compensation GR: चार जिल्ह्यांतील २२ हजार शेतकऱ्यांना दिलासा; मार्चमधील 'अवकाळी'च्या नुकसानीपोटी १६ कोटी मदत मंजूर

Krishna River: कृष्णा नदीत रविवारपर्यंत उपसाबंदी

Agrowon Podcast: काकडीला उठाव कायम; सोयाबीनमध्ये घट, कापसात चढ उतार, गव्हाचा भाव स्थिर, केळीला उठाव

SCROLL FOR NEXT