Tambul Agrowon
ॲग्रो विशेष

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

Tambul Prasad : माहूर येथील रेणुकादेवी संस्थानमध्ये प्रसाद म्हणून मान्यता असलेल्या तांबूलला भौगोलिक मान्यता मिळाली आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Yavatmal News : माहूर येथील रेणुकादेवी संस्थानमध्ये प्रसाद म्हणून मान्यता असलेल्या तांबूलला भौगोलिक मान्यता मिळाली आहे. आता याच तांबूलला व त्या माध्यमातून खाण्याच्या पानाला बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न विडूळ फार्मर प्रोड्युसर कंपनीद्वारे होत आहे. या कंपनीने पहिल्याचवर्षी तब्बल पाच हजार रुपये किलो दराने तांबूलची विक्री केली आहे.

उमरखेड तालुक्‍यातील विडूळ परिसरात पानवेलीखालील २७ हेक्‍टर क्षेत्र आहे. कधी ५० रुपयांना १००० तर वर्षातील एक-दोनदा १००० रुपयांना १००० नग पाने असा दर मिळतो. परिणामी खाण्याच्या पानाचे मूल्यवर्धन गरजेचे आहे. ही बाब शेतकरी उत्पादक कंपनीने हेरली.

गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मानवी आरोग्य धोक्‍यात आल्याचे लक्षात घेता त्यांच्यासाठी खाण्याच्या पानांपासून तयार होणाऱ्या तांबूलचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. यातूनच पानासाठी वेगळी बाजारपेठही विकसित होईल.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू शरद गडाख, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, विजय माने, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक संतोष डाबरे, तालुका कृषी अधिकारी गंगाधर बळवंतकर यांचे या प्रकल्पात मोठे योगदान आहे, अशी माहिती रामेश्‍वर बिच्चेवार यांनी दिली.

...असे करतात तांबुल

जायपत्री, सोप, १५ मसाले तसेच इराणी केसर (याची दुबईवरुन आयात केली) या घटकांचा वापर करून शेतकरी कंपनीने खास तांबूल तयार केले आहे. १० किलो तांबूल बनविण्यासाठी २० किलो नागवेलीची पाने लागतात.

पानांमध्ये ९० टक्‍के पाणी राहते. क्रश करतो त्यावेळी डिहायड्रेशन होते. त्यामुळे हे प्रमाण दुप्पट करावे लागते. २०२३-२४ या आर्थिक वर्षात या खास तांबूलची पाच हजार रुपये किलोप्रमाणे विक्री करण्यात आली. २८०० रुपये याचा उत्पादन खर्च आहे.

...असे पान नाकारतात

‘‘पान तोडणीवेळी त्याचा काही भाग कापला गेल्यास ते पान तसेच लहान पान बाजारात विकले जात नाही. प्रक्रियेमुळे त्यालाही हमखास बाजारपेठ मिळेल. ४०० रुपये प्रती १००० असा हमीभाव देऊ,’’ असा दावाही रामेश्‍वर बिच्चेवार यांनी केला. जाड पान (पिकविण्यासाठी, गुजरात, उत्तरप्रदेश मध्ये पिवळे पान खातात), शेंडा पान अर्थात कोवळ्या पानास अधिक मागणी आहे.

तांबूलचे आंतरराष्ट्रीय स्तरावर लॉंचिग करण्यासाठी ॲमेझॉन या ऑनलाइन प्लॅटफार्मची मदत घेऊ. त्यासाठी दोनवेळा दुबईचा दौरा केला आहे. सयंत्रासाठी २५ लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे दाखल केला. सध्या सूर्यप्रकाशावर ड्राय करून तांबूल तयार करण्याची प्रक्रिया होते.
- रामेश्‍वर बिच्चेवार, संचालक, विडूळ फार्मर प्रोड्युसर कंपनी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Flood Package: अतिवृष्टीच्या ‘पॅकेज’चा फुसका बार; शेतकऱ्यांशी पुन्हा एकदा शब्दांची चलाखी

Crop Damage Compensation : संत्रा-मोसंबी बागायतदारांना भरपाई देण्याची मागणी

Trap Crops: रब्बीत सापळा पिकांतून करा कीड-रोग नियंत्रण; सोप्या पध्दतीने होतो फायदा

PM Kisan 21st Installment: जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले २ हजार, महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना कधी मिळणार २१ वा हप्ता?

Farmer Compensation : भरीव मदतीसाठी ‘प्रहार’चे ताटवाटी आंदोलन

SCROLL FOR NEXT