Truck Driver Strike Agrowon
ॲग्रो विशेष

Truck Driver Strike : ...अखेर ट्रक चालकांचा संप मागे

New Motor Vehicle Act : केंद्र सरकारच्या नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात पुकारेला संप ट्रक चालकांनी अखेर मागे घेतला आहे. त्यामुळे अनेक प्रश्न सुटणार असून थांबलेली चाके पुन्हा गतिमान होणार आहेत.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : केंद्र सरकारच्या नवीन मोटार वाहन कायद्यातील तरतुदींमुळे देशभरातील ट्रक चालकांच्यात नाराजी पसरली होती. यामुळे राज्यभर ट्रक चालकांनी संप पुकारत आपली वाहने आहेत तिथेच लावली होती. त्यामुळे पेट्रोल पंप, वाहतूक कोंडी, विद्यार्थ्यांना फटका यासह कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर परिणाम झाला होता. पण आता दोन दिवसानंतर यावर तोडगा निघाला असून ट्रक चालकांनी संप मागे घेतला आहे.

नव्या मोटारवाहन कायद्याविरोधात देशभरातील ट्रक चालकांनी संप पुकारला होता. तो संप मागे घेण्यात आला आहे. या नव्या कायद्यामुळे देशात रोषनिर्माण झाल्यानंतर केंद्र सरकारकडून यावर मंगळवारी (ता. २ रोजी) स्पष्टीकरण देण्यात आले. तसेच हिट अँड रनचा कायदा लगेच लागू केला जाणार नाही, असेही सरकारकडून सांगण्यात आले आहे. याबाबत केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी माहिती दिली आहे.

काय म्हणाले केंद्रीय गृहसचिव?

ट्रक चालकांनी संप मागे घ्यावा असे आवाहन सरकारकडून केंद्रीय गृहसचिव यांनी ट्रान्सपोर्ट संघटनांना केले. तसेच त्यांनी तूर्तास हा कायदा लागू होणार नसल्याचं सांगितले. तसेच अजय भल्ला म्हणाले, "आम्ही ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. नवीन नियम अद्याप लागू झालेला नाहीये. तर जेव्हा हा लागू केल्या जाईल त्याच्याआधी आम्ही ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करू आणि मग निर्णय घेऊ."

राज्यातील ट्रक चालकांचा संप मागे

केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर राज्यातील महाराष्ट्र राज्य चालक-मालक महासंघाने आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच महासंघाने आपला बंद मागे घेण्याची घोषणा केली. यामुळे राज्यातील सर्व मालवाहतूक सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E Crop Survey: ई-पीक पाहणीत शेतमालाची नोंदच नाही

Jaltara Project: नांदेड जिल्ह्यात साकारणार एक लाख ‘जलतारा’

Wheat Farming: खानदेशात गहू पीक पेरणी सुरूच

Ravikant Tupkar: उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या, अन्यथा रस्त्यावर उतरून लढा: रविकांत तुपकर

Rabi Sowing: तीन जिल्ह्यांत किंचित वाढली रब्बी पेरणीची गती

SCROLL FOR NEXT