Tribal Women Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Illegal Liquor : दारू, जुगाराविरोधात संतप्त महिला रस्त्यावर

Tribal Women Protest : आदिवासीबहुल साक्री तालुक्यातील लघडवाळ आणि शिवाजीनगर या दोन गावांची एकच व्यथा आहे. काही वर्षांपासून या गावांतील पुरुष मंडळी दारू आणि जुगाराच्या दलदलीत रुतली आहेत.

Team Agrowon

Dhule News : आदिवासीबहुल साक्री तालुक्यातील लघडवाळ आणि शिवाजीनगर या दोन गावांची एकच व्यथा आहे. काही वर्षांपासून या गावांतील पुरुष मंडळी दारू आणि जुगाराच्या दलदलीत रुतली आहेत.

कर्तापुरुष असूनही संसाराची गाडी रुळावरून उतरत आहे. मुलांच्या प्रगतीपर स्वप्नांवर पाणी फिरत आहे. अशा विदारक दृश्यांनी लघडवाळ आणि शिवाजीनगरमधील महिला कमालीच्या व्यथित झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी दारू, जुगाराविरोधात एल्गार पुकारला आहे.

डोळ्यांदेखत नवरा असो की मुलागा, तो व्यसनाच्या आहारी जाताना या दोन गावांतील महिलावर्गाला पाहावे लागत आहे. त्यातून रोज घरोघरी होणारे भांडण-तंटे, कष्टाने कमाविलेल्या पैशांचा अपव्यय पाहाता या असह्य वेदनेतून मार्ग काढण्यासाठी लघडवाळ ग्रामपंचायतीच्या बचत गटातील महिला आणि दोन्ही गावांतील असंख्य ग्रामस्थ १ मेस एकत्र आले. अनेकांचा या गंभीर समस्येने बैठकीत घुसमटलेल्या भावनांचा बांध फुटला. आता पुरे! या दारू आणि जुगाराच्या राक्षसाला आपल्या गावातून हद्दपार करायचाच निर्धार माता-भगिनींनी केला.

खुलेआम दारूविक्री

या दृढ निश्चयाने लघडवाळ आणि शिवाजीनगरमधील संतप्त महिलांनी आपली व्यथा आणि अपेक्षांचे निवेदन साक्री पोलिस ठाण्याला सादर केले. आमचा संसार वाचवावा, अशी याचना त्यांनी पोलिसांना केली. गेल्या चार ते पाच वर्षांपासून दोन्ही गावांमध्ये अवैध व्यावसायिकांकडून खुलेआम दारूविक्री होत आहे आणि जुगाराचे अड्डे चालविले जात आहेत.

त्यामुळे गावातील पुरुष केवळ शारीरिक आणि मानसिकरीत्या खचले नाहीत, तर अनेक निष्पाप मुलामुलींचे भविष्य अंधारात लोटले जात आहे. त्यामुळे कठोर भूमिका घ्यावी लागत आहे. गावात दारू विकताना किंवा जुगार खेळताना आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महिला आंदोलकांनी साक्री पोलिसांकडे केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Damage Compensation : खरडून गेलेल्या जमिनीचे अचूक पंचनामे करा

Sugarcane Rate : मांजरा साखर कारखाना देणार उसाला उच्चांकी दर

Landslide : पावसाचा जोर वाढला; करूळ घाटात दरड कोसळली

Solapur Flood : पूरबाधित ४० गावांतील नुकसानग्रस्त घरांच्या तातडीने याद्या तयार करा

Pomegranate Crop Damage : सांगली जिल्ह्यात डाळिंबाचे नुकसान

SCROLL FOR NEXT