Tribal Development Schemes Agrowon
ॲग्रो विशेष

Tribal Development Department Recruitment : आदिवासी विकास विभागाची पदभरती तूर्त स्थगित

Recruitment : आयुक्त, आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य यांच्या स्तरावर २३ नोव्हेंबर २०२३ रोजी आदिवासी विकास विभागातील ७०२ विविध रिक्त पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

Team Agrowon

Nashik News : नाशिक : आयुक्त, आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य यांच्या स्तरावर २३ नोव्हेंबर २०२३ रोजी आदिवासी विकास विभागातील ७०२ विविध रिक्त पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु शासन निर्देशानुसार काही अपरिहार्य कारणामुळे ही पदभरती जाहिरात तुर्तास स्थगित करण्यात आली असल्याचे आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य यांच्या स्तरावरून या पदभरती जाहिरातीनुसार २३ नोव्हेंबर २०२३ ते १३ डिसेंबर २०२३ या कालावधीत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. विविध पदांकरिता उमेदवारांचे अर्जही ऑनलाइन प्राप्त झाले होते. तथापि २६ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या महाराष्ट्र अधिनियम क्र.१६ अन्वये सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) या संवर्गाचा समावेश करून त्यानुसार बिंदुनामावली अद्ययावत करून गट ‘क’ संवर्गासाठी जाहिरात पुनश्च प्रसिद्ध करण्याबाबत शासनस्तरावरून सूचित करण्यात आले आहे.

त्यामुळे २३ नोव्हेंबरची जाहिरात तुर्तास स्थगित करण्यात आली असून, याची नोंद उमेदवारांनी घेण्याचे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे. तसेच, याबाबत आदिवासी विकास विभागातील क्षेत्रीय कार्यालयाकडून पुनश्च बिंदुनामावली अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे त्यानंतर या बाबतची पुढील कार्यवाही सविस्तर कळविण्यात येणार असल्याची अर्ज भरलेल्या उमेदवारांनी नोंद घ्यावी, असेही नमूद करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana E-KYC : पूरग्रस्त महिलांसाठी दिलासा! ‘लाडकी बहीण’ योजनेची ई-केवायसी मुदत १५ दिवसांनी वाढवली

Rabi Season Crop Planning : कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी पीक नियोजन

PM Kisan Yojana : पीएम किसान निधीच्या २१ व्या हप्त्यापूर्वी ३१ लाख शेतकऱ्यांची नावे वगळली?; केंद्राचे मोठे पाऊल

Nutritional Benefits of Moringa : मूल्यवर्धनासाठी उपयुक्त शेवगा

Farm Loan Waiver : शेती कर्जमाफीची अनिवार्यता!

SCROLL FOR NEXT