Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department Transfers: कृषी विभागात समुपदेशनाने बदल्यांना पुन्हा सुरुवात

Officer Transfer Transparency: कृषी विभागातील बदल्यांच्या घोडेबाजाराला लगाम घालण्यासाठी कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी समुपदेशन पद्धत पुन्हा सुरू केली आहे.

मनोज कापडे

Pune News: कृषी विभागातील बदल्यांच्या घोडेबाजाराला लगाम घालण्यासाठी कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी समुपदेशन पद्धत पुन्हा सुरू केली आहे. कुणालाही लाच न देता पसंतीक्रमाने बदली मिळण्यासाठी समुपदेशन सुरू झाल्यामुळे अधिकारी वर्गाला सुखद धक्का बसला आहे.

कृषी सेवा गट-ब, महाराष्ट्र कृषी सेवा गट-ब (कनिष्ठ) व कृषी अधिकारी (जिल्हा परिषद) कनिष्ठ अशा राजपत्रित अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी कृषी आयुक्तांनी शुक्रवारपासून (ता. २३) पुण्यात समुपदेशन प्रक्रिया सुरू केली आहे. पुणे कृषी महाविद्यालयाच्या आवारातील शिरनामे सभागृहात सुरू झालेल्या समुपदेशनासाठी पहिल्याच दिवशी राज्याच्या विविध भागांमधून कृषी अधिकारी हजर झाले.

पहिल्या दिवशी महाराष्ट्र कृषी सेवा गट-ब व गट-ब (कनिष्ठ) यांचे समुपदेशन झाले. शनिवारी (ता. २४) व रविवारी (ता. २५) पुन्हा गट-ब (कनिष्ठ) वर्गाचे तसेच जिल्हा परिषदेतील गट-ब कनिष्ठ राजपत्रित कृषी अधिकाऱ्यांचे समुपदेशन होणार आहे. ३१ मे २०२५ अखेर बदलीस पात्र असलेल्या कृषी अधिकाऱ्यांना समुपदेशनात सहभागी करून घेण्यात येत आहे.

बंद पडलेली समुपदेशन पद्धती कृषिमंत्र्यांसह कृषी सचिव विकासचंद्र रस्तोगी व कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी पुन्हा लागू केल्यामुळे कृषी विभागातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

मोफत बदलीसाठी दहा विकल्प

कृषी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा घोडेबाजार थांबविण्यासाठी समुपदेशनाची पद्धत लागू झाली होती. पूर्वी मंत्रालयातील लॉबीने पद्धतशीरपणे ही पद्धत बंद पाडली. त्यानंतर तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या काळात बदल्याचे थेट रेटकार्ड राज्यभर गाजले. आता कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी बदल्यांचे अधिकार स्वतःहून सोडले व प्रशासनाला नियमानुसार बदल्यांची सूट दिली.

त्यामुळे कृषी आयुक्तांनी पुन्हा समुपदेशन पद्धत लागू केली. या पद्धतीत बदलीपात्र अधिकाऱ्यांकडून दहा विकल्प घेतले जातात. त्यात पसंतीक्रम, प्राधान्यक्रम, पूर्वी केलेल्या सेवांची माहिती विचारात घेत प्रशासनाकडून अधिकाऱ्यांना पसंतीच्या ठिकाणी मोफत बदली दिली जाते. त्यासाठी आयुक्तांनी बदलीपात्र अधिकाऱ्यांची यादी, रिक्त पदे याची माहिती संकेतस्थळावर जाहीर केली आहे. या पारदर्शक कामकाजामुळे बदल्यांमधील घोडेबाजाराला यंदा काही प्रमाणात आळा बसणार आहे.

बदल्या हा विभागाच्या कामकाजाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील विषय असतो. बऱ्याच वेळा त्याभोवती अनावश्यक गूढता निर्माण केली जाते आणि त्याचा गैरफायदा काही मंडळी घेतात. सर्वसमावेशक व पारदर्शक पद्धतीने बदल्या झाल्यास त्याचा कार्यक्षमतेवर अत्यंत सकारात्मक परिणाम होतो. कृषिमंत्र्यांनी त्यांचे अधिकार आयुक्तांना प्रदान करणे व आयुक्तांच्या स्तरावर समुपदेशनाने बदल्या होणे, या प्रक्रियेसाठी कृषिमंत्री व प्रधान सचिवांचे मार्गदर्शन मिळणे या साऱ्या बाबी कृषी विभागाच्या कामकाजाला अत्यंत चांगले वळण देणाऱ्या ठरत आहेत.
सूरज मांढरे, कृषी आयुक्त

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Udgir Development Fund: उदगीरच्या विकासासाठी ३१ कोटींचा निधी मंजूर

Farmer Compensation: नदीकाठच्या शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षाच

Shepherds Migration: मेंढपाळांचा मुक्काम पूर्व खानदेशातील तालुक्यांत कायम

Agriculture Processing Industry: कृषी प्रक्रिया उद्योगातून आर्थिक विकास शक्य : चराटी

Local Mango Flowering: गावरान आंब्याला आला मोहर

SCROLL FOR NEXT