Farmer Training Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Training : परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत शेतकरी प्रशिक्षण

Agriculture Development Scheme : परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रिय शेती) योजना अंतर्गत एकदिवसीय शेतकरी प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रम डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्रात झाला.

Team Agrowon

Akola News : शेतीत रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी करून जमिनीचा पोत सुधारावा, उत्पादित मालाची प्रत सुधारण्याच्या उद्देशाने सेंद्रिय शेतीच्या विकासावर भर देण्यात येत आहे.

त्यासाठी परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रिय शेती) योजना अंतर्गत एकदिवसीय शेतकरी प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रम डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्रात झाला.

हा प्रशिक्षण कार्यक्रम आत्मा प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे, पातूर तालुका कृषी अधिकारी धनंजय शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. यावेळी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. परीक्षित शिंगरूप, डॉ. नीलिमा दरेकर, इश्वर बोबडे, दुर्गा तायडे, प्रतीक्षा झिमटे, अभिजित ठाकरे, पातूर तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक किरण दंदी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ईश्वर बोबडे यांनी केले. सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन करताना डॉ. नीलिमा दरेकर यांनी जिवामृत, दशपर्णी कशाप्रकारे तयार करावे व त्याचे फायदे, उपयोगाबद्दल माहिती दिली. ईश्वर बोबडे यांनी गांडूळ खत निर्मिती, बायोडायनॅमिक कंपोस्ट खत, सेंद्रिय खत, पीक पद्धती, सेंद्रिय निविष्ठांचा वापर, प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन केले.

किरण दंदी यांनीही उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत शासनाच्या योजनेचा उद्देश सांगितला. सेंद्रिय गटातील शेतकरी या कार्यशाळेला उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT