Paddy Harvesting  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Paddy Harvesting : आजच्या आधुनिक युगात विविध यंत्रणांचा शेतीक्षेत्रात वापर केला जात असतानाही, विक्रमगड तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र पारंपरिकता जपून भात झोडपणीची-मळणीची कामे केली जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

Team Agrowon

Vilramgad News : ढवळ्या पवळ्यांना एकत्र करून पुन्हा एकदा शेतावरील खळ्यांमध्ये भातझोडपणीने वेग घेतला आहे. सध्या विक्रमगड तालुक्यातील बहुतेक भातकापणीची कामे आटपत आली असून आता शेतकरी सद्यस्थितीत भातझोडपणीच्या कामांना लागलेला आहे.

आजच्या आधुनिक युगात विविध यंत्रणांचा शेतीक्षेत्रात वापर केला जात असतानाही, विक्रमगड तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र पारंपरिकता जपून भात झोडपणीची-मळणीची कामे केली जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

विक्रमगडसारख्या ग्रामीण भागात मुख्यत्वे करून वाड्या-वस्त्यांमध्ये आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली रुढी-परंपरा जपली जात आहे. मळणीची कामे त्याच जुन्या पारंपरिक पद्धतीनेच जुन्या साहित्यानुसार केली जात आहेत.

विक्रमगड तालुक्यातील भातशेती कापणीचा काळ आता संपत आला आहे. सात हजार ८५८ हेक्टर क्षेत्रातील गावागावात तयार भातपीक कापून आपल्या शेतामध्ये असलेल्या खळ्यावर साठविले जाते व त्यानुसार भातपिकाच्या मळणीची कामे सुरू झाली आहेत.

दिवस मावळतीला जाताच शेतावरील खळ्यांमधून हैक... हैक... हुर्र... अशा आरोळ्या परिसरामधून ऐकू येऊ लागल्या आहेत. या मळणीबाबत शेतकरी विजय सांबरे यांनी सांगितले की, भातकापणी, मळणीची कामे ही यंत्रे आली तरी काही भागात ही पारंपरिक पद्धतीनेच केली जातात.

पारंपरिक खळ्यांचा वापर

कापणी केलेल्या भाताच्या पेंढ्या झालेल्या असल्या तरी काही प्रमाणात पेंढींना भात शिल्लक राहतो. शेतावर किंवा घराजवळ यासाठी पारंपरिक खळे राखून ठेवलेले असते. या खळ्याभोवती झोडलेल्या भाताच्या काड्यांचा ढीग (उडवी) चरले जातात. खळ्याच्या मध्यभागी लाकडाचा खांब लावला जातो आणि त्याला जनावरे बांधून मळणी काढली जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT