Shambhuraje Desai Agrowon
ॲग्रो विशेष

Mahabaleshwar Tourism Festival: महाबळेश्‍वरमध्ये एप्रिलमध्ये पर्यटन महोत्सव : शंभूराज देसाई

Tourism Department: शासनाच्या पर्यटन विभाग, पर्यटन संचालनालयाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्यासाठी २६ ते २८ एप्रिल या कालावधीत तीन दिवस महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

Team Agrowon

Satara News: शासनाच्या पर्यटन विभाग, पर्यटन संचालनालयाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्यासाठी २६ ते २८ एप्रिल या कालावधीत तीन दिवस महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्‍घाटन होणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या तीनदिवसीय महोत्सवात प्रेक्षणीय स्थळे, स्थानिक कला - संस्कृती, खाद्य संस्कृतीची ओळख पर्यटकांना व्हावी यातूनच पर्यटन वृद्धी व्हावी, हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.

मंत्री देसाई म्हणाले, ‘‘तीन दिवस चालणाऱ्या या पर्यटन महोत्सवाला पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी, जिल्हाधिकारी संतोष पाटील उपस्थित राहतील.

या महोत्सवात कला-संस्कृती, हस्तकला, पाककृती, तसेच स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल व स्थानिक पर्यटन स्थळांना पर्यटनात्मक प्रसिद्धी देण्यात येणार आहे. स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडविणारे कार्यक्रम, तसेच नामांकित कलाकारांचा सहभाग, स्ट्रॉबेरी व कृषी पर्यटन महोत्सवाचे आयोजन, पर्यटकांच्या निवासासाठी विविध श्रेणीच्या तंबू निवास उभारणी, पॅराग्लायडिंग, पॅरामोटरिंग, जलक्रीडा, ट्रेकिंग, रॉक

क्लायबिंग, घोडेस्वारी असे विविध साहसी उपक्रम राबविणे, स्थानिक बचत गटांचे हस्त कला-कृतीचे प्रदर्शन व विक्रीचे दालन, स्थानिक पाककलाकृती संस्कृती व खाद्य महोत्सव दालन, महाबळेश्वर येथील विविध प्रेक्षणीय स्थळे व पुरातन मंदिरांचे दर्शन, पाचगणी, कास पठार, कोयनानगर, तापोळा, गड-किल्ले दर्शन व इतर पर्यटन स्थळ सहलीचे आयोजन करण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT