Deputy Chief Executive Officer Rajendra Desale Agrowon
ॲग्रो विशेष

Rajendra Desale : संपूर्ण स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी

Zilla Parishad Water and Sanitation Department : ‘‘संपूर्ण स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी,’’ असे प्रतिपादन जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले यांनी केले

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : ‘‘संपूर्ण स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी,’’ असे प्रतिपादन जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले यांनी केले

‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत राज्य पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर व ग्रामविकास संस्था संयुक्त विद्यमाने हॉटेल इकोटेल जालना रोड येथे ग्रामपंचायतस्तरीय भागधारक दोन दिवसीय क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत होते. या प्रसंगी डॉ. रमेश पांडव, नरहरी शिवपुरे, राजू सोनवणे, वैशाली जगताप, संजय वाघ, जयप्रकाश बागडे, आशिष कुलकर्णी, यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. देसले म्हणाले, ‘‘ वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाची मोठ्या प्रमाणात उभारणी करून हागणदारी मुक्त महाराष्ट्र आपण करू शकलो. टप्पा दोनमध्ये घनकचरा, सांडपाणी, प्लॅस्टिक मुक्त गाव, मैला गाळ व्यवस्थापन, बायोगॅस या पाच घटकांवर ग्रामपंचायतस्तरीय प्रमुख पाच भागधारकांच्या माध्यमातून संपूर्ण स्वच्छतेद्वारे समृद्ध गावाची उभारणी करून राज्यात व देशात उत्कृष्ट काम करायचे आहे.

ग्रामविकास संस्थेचे सचिव नरहरी शिवपुरे यांनी प्रास्ताविकात प्रशिक्षण आयोजनामागची भूमिका व ग्रामविकास संस्थेच्या शाश्वत ग्रामविकास व समाजाभिमुख विविध प्रकल्पाची माहिती दिली. प्रशिक्षणात लोकसहभागातून घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता व उपाययोजना या विषयावर अनुक्रमे डॉ. रमेश पांडव, प्रा. जयप्रकाश बागडे, किशोर साळवे, यांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी बालाजी बिरादार, राहुल रगडे, रवी सातदिवे यांची उपस्थिती होती. प्रशिक्षण कार्यक्रमात ग्रामविकास दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. करोडी, साजापूर, तिसगाव, गोलवाडी व परिसरातील बारा गावचे सरपंच, ग्रामसेवक, आशा वर्कर, महिला बचत गट प्रतिनिधी उपस्थित होते. प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अर्चना पवार, रूपाली वराडे, संदीप शिंदे, रूपाली खरात, विद्या दौंड, निवृत्ती घोडके, प्रकाश राठोड, कृष्णा पवार यांनी परिश्रम घेतले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Farmer Issue: सोयाबीन उत्पादकांच्या पदरी निराशा

Loan Disbursement: बँकांनी कर्ज वितरणाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे : जिल्हाधिकारी डुडी

Mahavistar Ai App: ‘कृषी’कडून शेतकऱ्यांसाठी ‘महाविस्तार एआय’ ॲप

California Import Ban: कॅलिफोर्नियातून आलेले कंटेनर पाठवले परत

Crop Loan: कर्जदार ९४ हजार शेतकऱ्यांना परतफेडीची चिंता

SCROLL FOR NEXT