Farmers Helpline Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Helpline : पीक नुकसान नोंदविण्यासाठीचे टोल फ्री क्रमांक सातत्याने व्यस्त

Team Agrowon

Akola News : या आठवड्यात सातत्याने झालेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आता पीकविमा कंपन्यांकडून पीक नुकसानीच्या पूर्वसूचना ७२ तासांच्या आत देण्याबाबत आवाहन केले जात आहे.

मात्र, याठिकाणीही शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत असून कंपन्यांचे टोल फ्री क्रमांक सातत्याने व्यस्त, तर कधी ऑऊट ऑफ कव्हरेज मिळत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

या खरीप हंगामाला सततच्या पावसाने मोठा फटका दिला आहे. या आठवड्यात सर्वत्र जोरदार पाऊस कोसळला. या पावसाने सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद, तूर अशा विविध खरीप पिकांचे नुकसान केले आहे.

आता पाऊस ओसरला तरी अनेक भागात सखल ठिकाणी पिके पाण्यात आहेत. मूळकुज वाढली. पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी पीकविमा कंपन्यांकडे पूर्वसूचनेसाठी धाव घेत आहेत. कंपन्यांकडून शेतकऱ्यांसाठी टोल फ्री क्रमांक दिल्याचे जाहीर केले आहे.

शिवाय ॲपचा वापर करण्याचा सल्ला दिला जात आहे. याही ठिकाणी शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागते आहे. टोल फ्री क्रमांक सातत्याने व्यस्त येत आहेत. तर अनेकवेळा आऊट ऑफ कव्हरेज असल्याचा संदेश मिळतो.

टोल फ्री क्रमांक कधीही व्यस्तच येतो आणि कधी कधी तर संपर्क क्षेत्राबाहेर दाखवतो. क्रॉप इन्शुरन्स ॲपची प्रक्रिया सर्व सामान्य शेतकऱ्यांना न समजणारी आहे. कंपन्यांच्या नियमाप्रमाणे नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या आतच नुकसानीची तक्रार करायची आहे. वीज, नेटवर्कची समस्या व काही शेतकऱ्यांच्या शेतात पाऊस झाल्यानंतर जायला रस्त्याअभावी अवघड झालेले असल्याने अडचणी आहेत. शहरात ऑफिसमध्ये बसुन नियम बनवायला फक्त सोपे आहेत. प्रत्यक्षात मात्र वेगळी परीस्थिती आहे.
- शुभम खडसे, शेलू खडसे, ता. रिसोड, जि. वाशीम

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan Scheme : पी.एम.किसान योजना; अठराव्या हप्त्यास शेतकरी मुकणार, तेरा हजार खाती आधार लिंकविना

Indian Agriculture : शिळ्या कढीला ऊत

Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुका तीन टप्प्यांत

Budget Update : अर्थसंकल्पातून प्रत्येक समाज घटकाला न्याय : अजित पवार

Watershed Mismanagement Case : पाणलोट गैरव्यवहारप्रकरणी फौजदारी कारवाई करा

SCROLL FOR NEXT