Nandurbar News Agrowon
ॲग्रो विशेष

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात कामगारांची नोंदणी करणार

ज्या लोकांना घर नाही, अशा व्यक्तींना विविध योजनांच्या माध्यमातून घरकुल देणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

Team Agrowon

Nandubar News : कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी त्यांची नोंदणी करून मेळाव्यांचे आयोजन करणार असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित (Minister Vijaykumar Gavit) यांनी केले.

महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यातर्फे जिल्ह्यातील बांधकाम कामगारांसाठी अत्यावश्यक व सुरक्षा संचवाटपांचा कार्यक्रम झाला. त्या वेळी डॉ. गावित बोलत होते.

जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हीना गावित, सरकारी कामगार अधिकारी अ. ज. रुईकर, निरीक्षक वि. प्र. जोगी, वि. रा. झांबरे, ल. प्र. दाभाडे, बा. स. डुकळे यांच्यासह बांधकाम कामगार उपस्थित होते.

मंत्री डॉ. गावित म्हणाले, की राज्यातील बांधकाम कामागारांना आरोग्यविषयक, शैक्षणिक, सामाजिक सुविधा उपलब्ध करून देणे तसेच त्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत बांधकाम क्षेत्रात प्रत्यक्ष काम करणाऱ्या बांधकाम कामगारांची संख्या अत्यंत कमी असून, बांधकाम कामगारांसाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवीत आहेत.

अशा नोंदणीकृत कामगारांची संख्या वाढवून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी येत्या काळात कामगार अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून जिल्ह्यात कामगारांच्या नोंदणीसाठी मेळाव्याचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आनंदाचा शिधा देणार

अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांना येणाऱ्या गुढीपाढवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे.

यात एक किलो रवा, एक किलो हरभराडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल असा पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे.

ज्या लोकांना घर नाही, अशा व्यक्तींना विविध योजनांच्या माध्यमातून घरकुल देणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हीना गावित यांनीही मनोगत व्यक्त केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT