Dr. Sanjay Bhave  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Technology : बदलत्या हवामानाला पूरक भातजाती, तंत्रज्ञान विकसित करावे

Dr. Sanjay Bhave : शाश्वत उत्पन्नासाठी शास्त्रज्ञांनी बदलत्या हवामानास पूरक भात जाती व तंत्रज्ञान विकसित करावे,’’ असे आवाहन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय भावे यांनी येथे केले.

Team Agrowon

Karjat News : ‘‘बदलत्या वातावरणामुळे सातत्याने ऋतुचक्र प्रभावीत होत असून अन्नसुरक्षेस धोका निर्माण झाल्याने शाश्वत उत्पन्नासाठी शास्त्रज्ञांनी बदलत्या हवामानास पूरक भात जाती व तंत्रज्ञान विकसित करावे,’’ असे आवाहन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय भावे यांनी येथे केले.

प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राच्या सह्याद्री अतिथी गृह सभागृहात आयोजित महाराष्ट्र राज्य वार्षिक भात चर्चासत्राच्या समारोपीय सत्रात प्रमुख मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीचे माजी सहायक महासंचालक डॉ. एन. डी. जांभळे, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीचे माजी प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एम. सी. खरकवाल, भारतीय भात संशोधन संस्था हैदराबादचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ए. एस. हरिप्रसाद, इंदिरा गांधी कृषी विश्वविद्यालय,

रायपूरच्या वनस्पती पैदास व अनुवंशिक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. दीपक शर्मा, आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेचे समन्वयक डॉ. विकास कुमार सिंग, वनस्पती शास्त्रविभाग प्रमुख डॉ. रमेश कुणकेरकर, सहयोगी संशोधन संचालक डॉ. शिवराम भगत व भात विशेषज्ञ डॉ. भरत वाघमोडे उपस्थित होते.डॉ. भावे पुढे म्हणाले, की नवे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी राज्याच्या संशोधकांना पुरेसे मनुष्यबळ, निधी व अद्यावत प्रयोगशाळा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अपुऱ्या सोयीसुविधा असतानाही शास्त्रज्ञांची कामगिरी प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

तांत्रिक सत्रात डॉ. एम. सी. खरकवाल, डॉ. ए. एस. हरिप्रसाद, डॉ. दीपक शर्मा, डॉ. एम. पी. गवई, डॉ. विकासकुमार सिंग, डॉ. एस. बी. स्वामी, डॉ. पुष्पा पाटील, डॉ. व्ही. पी. सावंत यांनी त्यांच्या विषयाचे सादरीकरण केले.

विविध तांत्रिक सत्राचे अध्यक्ष म्हणून डॉ. पी. ई. शिनगारे, डॉ. एन. डी. जांभळे, डॉ. ए. एल. नरंगलकर, डॉ. दीपक शर्मा यांनी तर सह अध्यक्ष म्हणून डॉ. पी. ई. शिनगारे, डॉ. आर. एल. कुणकेरकर, डॉ. एम. सी. खरकवाल, डॉ. ए. व्ही. कोल्हे, डॉ. एम. एस. जोशी, डॉ. एस. व्ही. सावर्डेकर, डॉ. बी. डब्ल्यू. वाघमोडे, डॉ. एस. बी. भगत यांनी भूमिका बजावली.

विविध सत्रांचे कार्यवृत्तांकन डॉ. व्ही. पी. सावंत, डॉ. एन. व्ही. म्हसकर, डॉ. व्ही. व्ही. दळवी, डॉ. व्ही. व्ही.सागवेकर, डॉ. जी. आर. श्यामकुंवर, डॉ. पी. बी. वणवे, डॉ. पी. डी. पाटील, डॉ. एम. पी. गवई, डॉ. के. एस. रघुवंशी, श्रीमती एम. एच. केळुसकर, डॉ. एन. व्ही. काशीद, डॉ. जे. पी. देवमोरे, डॉ. टी. जे. बेडसे व डॉ. एस.डी. कुंभार यांनी केले. भात शरीरक्रिया शास्त्रज्ञ डॉ. जे. पी. देवमोरे यांचा सत्कार संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे यांच्या हस्ते झाला. आभार डॉ. भरत वाघमोडे यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Cultivation Techniques: कापूस उत्पादनवाढीसाठी सघन लागवड पद्धत

Agri Innovation: कृषी उद्योजकांनी ज्ञान, संशोधनाचा विस्तार करावा

Agriculture Crisis: दिल्लीतील घोषणा अन् शिवारातील वेदना

Milk Adulteration Racket: गोरखधंदा भेसळीचा!

Maharashtra Vanshree Award 2024: ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ जाहीर

SCROLL FOR NEXT