Soil Health Card Scheme : जमिनीच्या आरोग्यासाठी २२९ कोटी रुपयांचा निधी; ८२७२ प्रयोगशाळा, २३ कोटी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड

Soil Testing Laboratories : देशातील शेतीसाठी केंद्र सरकारकडून चांगली पावले उचलली जात असून जमिनीचे आरोग्यावर विशेष लक्ष दिले जात आहे. यासाठी देशभरात ८२७२ प्रयोगशाळ कार्यरत आहेत. ज्याच्यावर कोट्यावधी रूपये खर्च केले जात आहेत.
Union Minister Arjun Munda
Union Minister Arjun MundaAgrowon

New Delhi News : आपल्या देशात शेती करणाऱ्यांची टक्केवारी अधिक आहे. तर शेतीसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही माती असते. जर मातीच चांगली नसेल तर शेतीत उत्पादन होणारच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मातीत पोत किती आहे. ती कशी आहे? हे पाहण्यासाठी देशभरात ८२७२ प्रयोगशाळांची निर्मिती भारत सरकारकडून करण्यात आली आहे.

तसेच मृदा आरोग्य कार्डाचे वाटत हे दुर्बल आणि गरीब शेतकऱ्यांना करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांनी दिली. त्यांनी ही माहिती एका लेखी उत्तरात गेल्या आठवड्यात लोकसभेत दिली.

मृदा आरोग्य कार्डाच्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या मातीची चाचणी केली जाते. ज्याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना होत आहे. देशात ८२७२ प्रयोगशाळांची निर्मिती झाली असून २२९ कोटींचा निधी जारी करण्यात आला आहे. तसेच गेल्या पाच वर्षांत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ८३.३१ कोटी रूपयांचे वाटप करण्यात आल्याचेही मुंडा यांनी सांगितले आहे.

Union Minister Arjun Munda
Soil Health Card : मृदा आरोग्य कार्ड योजनेंतर्गत तपासा जमिनीची सुपिकता

८२७२ प्रयोगशाळा

शेतकऱ्यांना मदत करण्यासासह शेतातील मातीची चाचणी करण्यासाठी देशभरात ८२७२ प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या आहेत. येथे शेतातील मातीची चाचणी केली जाते. ज्याचा अहवाल संबंधित शेतकऱ्याला दिला जातो. ज्यामुळे शेतकरी मातीच्या गुणवत्तेच्या आधारे पिकांची लागवड करतो आणि अधिक नफा मिळवतो.

ग्रामस्तरावरही प्रयोगशाळा

मृदा आरोग्य कार्डाच्या योजनेअंतर्गत २०१४-१५ पासून आतापर्यंत देशभरात ८२७२ प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या आहेत. यात १०६८ स्थिर माती परीक्षण प्रयोगशाळा, १६३ फिरत्या माती परीक्षण प्रयोगशाळा, ६३७६ लघु माती परीक्षण प्रयोगशाळा आणि ६६५ ग्रामस्तरीय माती परीक्षण प्रयोगशाळांचा समावेश आहे.

Union Minister Arjun Munda
Fertilizer Management : काटेकोर खत व्यवस्थापनातून पीक उत्पादनवाढ, मृदा आरोग्य सुधारणा

मृदा आरोग्य कार्ड

केंद्र सरकारकडून मृदा आरोग्य कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना राष्ट्रीय कृषी अभियानाच्या मृदा आरोग्य आणि सुपीकता या राष्ट्रीय प्रकल्पांतर्गत २०१४-१५ पासून सुरू आहे. या योजनेतंर्गत आतापर्यंत २३.५८ कोटी मृदा आरोग्य कार्ड शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली आहेत.

शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शक

मृदा आरोग्य कार्ड योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शक करण्यात येते. सेंद्रिय खते आणि जैव-खतांसह दुय्यम आणि सूक्ष्म पोषक तत्वांसह रासायनिक खतांच्या वापरासंबंधीत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता करण्याचे काम या योजनेतून केले जाते.

तसेच शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिके आयोजित केली जातात. आतापर्यंत देशभरात ९३७८१ शेतकरी प्रशिक्षण, ६.४५ लाख प्रात्यक्षिके आणि ७४२५ शेतकरी मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com