Turmeric Cultivation  Agrowon
ॲग्रो विशेष

Turmeric Pest Management : हळद, आले पिकांतील कीड रोगाचे वेळेवर व्यवस्थापन गरजेचे

Ginger Pest Management : हळद व आले (अद्रक) या कंदवर्गीय पिकांच्या उत्पादकतेवर जमिनीतून उद्भवणाऱ्या कीड, रोगांमुळे परिणाम होऊ शकतो.

Team Agrowon

Parbhani News : हळद व आले (अद्रक) या कंदवर्गीय पिकांच्या उत्पादकतेवर जमिनीतून उद्भवणाऱ्या कीड, रोगांमुळे परिणाम होऊ शकतो. कीड, रोगाच्या प्राद्रुभावाचे निरीक्षण करुन वेळेवर नियंत्रण करावे लागेल.

त्यामुळे नुकसान कमी करता येऊ शकेल असा सूर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय व कृषी विभाग, कीटकशास्त्र विभागातील क्रॉपसॅप प्रकल्प अंतर्गत ऑनलाइन शेतकरी शास्त्रज्ञ कृषी संवाद कार्यक्रमात उमटला.

अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा होते. कृषी कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे, उद्यानविद्या शास्त्रज्ञ डॉ. शिवाजी शिंदे, पीकरोग शास्त्रज्ञ डॉ. गजेंद्र जगताप, कृषी कीटक शास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत, डॉ. अनंत लाड, डॉ. गजानन गडदे, डॉ. प्रशांत देशमुख सहभागी झाले होते.

डॉ. इंद्र मणी म्हणाले, की हळद, आले पिकांसाठी विद्यापीठ विकसित बायोमिक्सचा वापर करावा. ऑनलाइन कृषी संवाद कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची विद्यापीठामध्ये नोंद घेतली जात असून त्याआधारे संशोधन करता येईल, पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमासाठी उपयोग होईल.

डॉ. डाखोरे यांनी हवामानाचा अंदाज व सल्ला सांगितला. डॉ. शिंदे यांनी हळद व आले पीक व्यवस्थापन यासाठी विकसित नवीन तंत्रज्ञान आणि वाणांची तर डॉ. जगताप यांनी रोग नियंत्रण तर डॉ. पटाईत यांनी कीड नियंत्रणावर माहिती दिली. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील शेतकरी सहभागी झाले होते. त्यांनी हळद व आले यासह सोयाबीन, कपाशी, फळबाग याविषयी प्रश्न विचारले यास विद्यापीठाचे शास्त्रज्ञ उत्तरे दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune MTI Journey: ‘एमटीआय’ची आठ दशकी दमदार वाटचाल

Orange Farming: करंजी परिसरातील शेतकऱ्यांना संत्र्यातून दिलासा

Farmer Issue: पुरंदरमधील वाटाणा उत्पादक अडचणीत

CM Devendra Fadnavis: नाशिकला बदलण्याची आमच्यामध्ये ताकद: फडणवीस

Misbranded Pesticide Case: ...तर विक्रेते-मार्केटिंग कंपन्या दोषी नाहीत!

SCROLL FOR NEXT