Water Canal Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : सांगलीतील सुरू योजनांचे आवर्तन बंद करण्याची वेळ

Irrigation Scheme Updates : धरणातून पाणी सोडण्यासाठी कोयना व्यवस्थापनाकडून कसल्याही प्रकारच्या हालचाली होत नाहीत. त्यामुळे सुरू योजनांचे आवर्तन बंद करण्याची वेळ आली आहे.

Team Agrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ, तासगाव, कडेगाव, मिरज पूर्वभागातील शेती संपूर्ण सिंचन योजनांवर अवलंबून आहे. त्यामुळे कृष्णा नदीत पाणी असेल तरच ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी उचलून देणे शक्य आहे.

मात्र, कोयनेतून कृष्णा नदीत पाणी सोडण्यात यावे यासाठी पाटबंधारे विभागाने पाच महिन्यांत तब्बल १८ वेळा पत्रव्यवहार केला आहे. मात्र, धरणातून पाणी सोडण्यासाठी कोयना व्यवस्थापनाकडून कसल्याही प्रकारच्या हालचाली होत नाहीत. त्यामुळे सुरू योजनांचे आवर्तन बंद करण्याची वेळ आली आहे.

जिल्ह्यात मध्यम दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ, तासगाव, कडेगाव, मिरज पूर्वभागातील शेती संपूर्ण सिंचन ताकारी, म्हैसाळ, आरफळ आणि टेंभू योजनांवर अवलंबून आहे.

त्यामुळे कोयना धरणातून पाणी सोडून उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करून या दुष्काळी पट्ट्यातील भागाला देणे सोपे होईल. दरम्यान, पाणी कालवा सल्लागार बैठकीत तसे पाणी सोडण्याबाबत नियोजन केले होते.

त्यानुसार कोयना धरण व्यवस्थापनाशीही चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार पाणीही सोडण्यात आले. परंतु पाणी सोडण्यात सातत्याने खंड पडू लागला. परिमाणी सिंचन योजनांचे सुरू असणारे आवर्तन बंद करावे लागले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Fertiliser Linking : उत्तर प्रदेशच्या धर्तीवर खत लिकिंगसाठी महाराष्ट्रात नवा नियम आणणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची विधानसभेत माहिती

Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Blight Disease: बदलत्या वातावरणात करपा रोगाची शक्यता

Raju Chaudhari Success Story: कडा ते कॅनडा

Nilesh Rane: कोकणातील आंबा, काजू बागायतदारांच्या मदत प्रश्नी निलेश राणेंनी कृषीमंत्र्यांना घेरले

SCROLL FOR NEXT