Rain Alert Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Alert : विदर्भात विजांसह पावसाचा इशारा

Weather Forecast : कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता

Team Agrowon

Pune Weather News : मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे असल्याने राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर पावासाने उसंत घेतल्याचे चित्र आहे. आज (ता. ४) कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता आहे, तर विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

बुधवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक असल्याचे दिसून आले.

कोल्हापुरातील आजरा येथे येथे सर्वाधिक १११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या. राज्याच्या अनेक भागांत ऊन-सावल्यांच्या खेळात उन्हाचा चटका वाढला आहे. मॉन्सून पुन्हा सक्रिय होऊन जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या फिरोजपूरपासून रोहतक, लखनऊ, बालिया, पूर्णिया, ते मणिपूरपर्यंत सक्रिय आहे. यातच पाकिस्तानपासून बांगलादेशपर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार आहे.

गुजरात आणि परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. गुजरात ते केरळ किनाऱ्याला लागून हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने किनाऱ्यालगत ढग जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

आज (ता. ४) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा, तर विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम सरींसह पावसाची उघडीप राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

कोकण :
पालघर : जव्हार २४, विक्रमगड ३१.
रायगड : माथेरान २९.
रत्नागिरी : खेड ४२, लांजा ४०, राजापूर २३, संगमेश्वर २५, वाकवली ३४.
सिंधुदुर्ग : आवळेगाव ३१, देवगड २२, दोडामार्ग ४१, कणकवली २०, मुलदे (कृषी) २४, सावंतवाडी ३०, वैभववाडी ५८, वेंगुर्ला ४८.
ठाणे : उल्हासनगर ५२.

मध्य महाराष्ट्र :
कोल्हापूर : आजरा १११, चंदगड ६८, गगनबावडा ८८, गारगोटी ४०, कागल २७, पन्हाळा ४३, शाहूवाडी ८०.
नाशिक : इगतपुरी ३२, त्र्यंबकेश्‍वर २१.
पुणे : भोर २२, पौड ५३, शिरूर २०, वेल्हे ५४.
सांगली : कोकरूड ५३, शिराळा २४.
सातारा : महाबळेश्वर ३९, पाटण ७२, सातारा ५६.
सोलापूर : सोलापूर २५.

मराठवाडा :
बीड : केज २०, पाटोदा २३.
धाराशिव : लोहारा ४४, तुळजापूर ४७, उमरगा २०.
लातूर : अहमदपूर २१, रेणापूर २५.
नांदेड : किनवट २५,
परभणी : पालम ३५, सोनपेठ ४७.

विदर्भ :
चंद्रपूर : सिंदेवाही २६.
गडचिरोली : अहेरी ३०, भामरागड २३, देसाईगंज वडसा ७३, कोरची २९, कुरखेडा ३७, सिरोंचा २८.
वर्धा : हिंगणघाट २१.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT