PG CET Exam Agrowon
ॲग्रो विशेष

VNMKV Parbhani : पी. जी. सीईटीमध्ये ‘वनामकृवि’चे तीन विद्यार्थी राज्यात प्रथम

Agriculture News : कृषी उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान, सामुदायिक विज्ञान, वनशास्त्र, मत्स्यशास्त्र, जैवतंत्रज्ञान कृषी व्यवसाय व्यवस्थापन या विषयातील पदव्युत्तर प्रवेशाकरिता सामाईक पात्रता परीक्षा (पीजी-सीईटी) घेण्यात आली होती.

Team Agrowon

Parbhani News : महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या (एमसीईएआर) महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळातर्फे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी कृषी व संलग्न पदवी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामाईक पात्रता प्रवेश परीक्षेत (पीजी-सीईटी) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विविध अभ्यासक्रमाचे तीन विद्यार्थी राज्यात प्रथम आले आहेत.

कृषी उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान, सामुदायिक विज्ञान, वनशास्त्र, मत्स्यशास्त्र, जैवतंत्रज्ञान कृषी व्यवसाय व्यवस्थापन या विषयातील पदव्युत्तर प्रवेशाकरिता सामाईक पात्रता परीक्षा (पीजी-सीईटी) घेण्यात आली होती. या परीक्षेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परभणी येथील कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी निखिल पडोळे यास कृषी विषयात ८८.५० टक्के गुण मिळाले.

परभणी येथील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या आनंद शिंदे यास कृषी अभियांत्रिकी विषयात ६० टक्के गुण मिळाले. परभणी येथील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाची ऋतुजा तापडिया या विद्यार्थिनीस सामुदायिक विज्ञान विषयात ७३.५० टक्के गुण मिळाले.

या तिघांनीही त्यांच्या विषयात रँकिंगमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या बदनापूर (जि. जालना) येथील कृषी महाविद्यालयाचे २५ विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर कृषी अभ्यासक्रमाच्या यादीमध्ये पहिल्या ५६ विद्यार्थ्यांमध्ये क्रमांक मिळविला.

लातूर येथील कृषी महाविद्यालयाचे ५० विद्यार्थी, अंबाजोगाई (जि. बीड) येथील कृषी महाविद्यालयाचे २७, धाराशिव येथील कृषी महाविद्यालयाचे ३४ तर गोळेगाव (जि. हिंगोली) येथील कृषी महाविद्यालयाचे १९ विद्यार्थांनी कृषी अभ्यासक्रमासाठी तर लातूर येथील जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या १२ विद्यार्थ्यांनी जैवतंत्रज्ञान अभ्यासक्रमासाठी, परभणी येथील अन्नतंत्र महाविद्यालयाच्या १८ विद्यार्थ्यांनी अन्नतंत्र अभ्यासक्रमासाठी १०० व्या रँकिंगच्या आत यश संपादन केले आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले आणि बीजोत्पादन संचालक डॉ. देवराव देवसरकर, सर्व महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT