Raju Shetti Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’ नव्हे, हा तर स्वार्थपीठ महामार्ग : राजू शेट्टी

Raju Shetti: महाराष्ट्र शासनाकडून होऊ घातलेला शक्तिपीठ महामार्ग नसून तो स्वार्थपीठ महामार्ग असल्याचे मत शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समितीचे प्रमुख तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथे व्यक्त केले.

Team Agrowon

Sindhudurg News: महाराष्ट्र शासनाकडून होऊ घातलेला शक्तिपीठ महामार्ग नसून तो स्वार्थपीठ महामार्ग असल्याचे मत शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समितीचे प्रमुख तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथे व्यक्त केले.

श्री. शेट्टी हे सावंतवाडी दौऱ्यावर आले होते. त्या वेळी त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर शक्तिपीठ महामार्गासंदर्भात येथील शेतकरी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. त्यांनी त्यांची पत्रकार परिषद झाली.

या वेळी त्यांच्यासोबत माजी आमदार वैभव नाईक, संपत देसाई, डॉ. जयेंद्र परुळेकर, सतीश सावंत, बाबूराव धुरी, इर्शाद शेख, राजेंद्र गुडेनवर, संग्राम कुपेकर, नागेश चौगुले आदी उपस्थित होते.

श्री. शेट्टी म्हणाले, की शक्तिपीठ महामार्गाविरोधात उभा केलेला लढा हा राजकीय नसून भूमिपुत्राच्या न्याय हक्कांसाठी आहे. ८६ हजार कोटी रुपये खर्च करून शासन २७ हजार एकर जमिनीचा आणि ५५ हजार शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणार आहे.

कुणा एकाच्या उद्योग समूहाला लाभ मिळावा यासाठी या महामार्गाचा घाट घातला जात आहे. एकीकडे मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण झालेला नसताना अशा प्रकारच्या महामार्गाची गरजच काय? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

सिंधुदुर्गात महामार्गाला विरोध करणाऱ्यांना फटके देऊ, अशी धमकी दिली जात आहे. मात्र खरोखरच हा मार्ग रद्द होणार असेल तर फटके खायची आमची तयारी आहे. सिंधुदुर्गने देखील या महामार्गाच्या विरोधात उभे राहण्याची गरज आहे. जरी सिंधुदुर्गने विरोध केला नाही तरीही या महामार्गाच्या विरोधात अखेरपर्यंत लढत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. श्री. शेट्टी यांनी पत्रादेवीला महामार्ग रद्द करण्याचे साकडे घालून दर्शन घेतले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Vaccination : खानदेशात पशुधन लसीकरण संथच

Crop Loan : पीक कर्ज वितरण आढावा बैठकच नाही

Crop Harvesting : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत ज्वारी, मका, काढणी सुरू

Crop Damage Compensation : बीडमध्ये मागणीपेक्षा ६८ कोटी कमी

Save Soil: माती आणि मानवी सभ्यता

SCROLL FOR NEXT