E-Peek Pahani Agrowon
ॲग्रो विशेष

E Peek Pahani : तेहतीस हजार शेतकऱ्यांचा ई-पीकपाहणीत सहभाग

Kharif Season : या काळात जिल्ह्यात एकूण ३३ हजार ३५३ शेतकऱ्यांनी ई-पीक पहाणीमध्ये सहभाग नोंदविला.

Team Agrowon

Nagar News : नगर जिल्ह्यात आतापर्यंत ३३ हजार ३५३ शेतकऱ्यांनी ई-पीकपाहणीमध्ये सहभाग नोंदविला. शेतरस्ते, शिवार रस्ते, पाणंद रस्त्याचे प्रश्न सोडवून रस्ते समन्वयाने खुले करण्यात आले. युवा संवाद कार्यक्रमातून ८ हजार ८३० दाखल्याचे युवकांना वाटप करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील सैनिकांना २६० दाखल्यांचे वाटप करत नवनियुक्त १८९ तलाठ्यांना नियुक्ती पत्राचेही वितरण करण्यात आल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

नगर येथे गुरुवारी (ता. १५) पोलिस मुख्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे तसेच अधिकारी उपस्थित होते.

विखे पाटील म्हणाले, की अनेक लोकोपयोगी निर्णयांतून सर्वसामान्यांना विकास साधण्याचे काम शासनामार्फत करण्यात येत आहे. विविध कल्याणकारी योजना गतीने व प्रभावीपणे राबवून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यात येत आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या संकल्पात सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. जनहिताचे अनेक निर्णय घेत शासनाची वाटचाल सुरू आहे. १ ते १५ ऑगस्ट दरम्यान महसूल विभगामार्फत महसूल पंधरवडा राबविण्यात आला.

या माध्यमातून शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, स्वातंत्र्य सैनिक, दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला. या काळात जिल्ह्यात एकूण ३३ हजार ३५३ शेतकऱ्यांनी ई-पीक पहाणीमध्ये सहभाग नोंदविला. शेतरस्ते, शिवार रस्ते, पाणंद रस्त्याचे प्रश्न सोडवुन रस्ते समन्वयाने खुले करण्यात आले.

जिल्ह्यातील खंडकरी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी भोगवटा वर्ग १ करून विनामूल्य करून देण्याचा शासनाने निर्णय घेतला असून आकारी पडीक जमिनींच्या प्रश्नाबाबतही सकारात्मक निर्णय झाल्याने या जमिनी त्यांना देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव

नगर येथे झालेल्या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील, पोलिस उपनिरीक्षक पल्लवी वाघ, समाधान फडोळ, मनोज अहिरे, मनोहर खिदळकर, विलास जाधव, तसेच युद्धात अपंगत्व आलेल्या नायब सुभेदार सुरेश आढाव, शिपाई बाळासाहेब डोंगरे, नायक किरण चौधरी, गनर कृष्णा हांडे या सैनिकांचा ताम्रपट देऊन गौरव करण्यात आला. विशेष उल्लेखनीय सेवा पुरस्काराकरिता निवड करण्यात आलेले सावरगावतळ (ता. संगमनेर) येथील पोलीस पाटील गोरक्ष नेहे, राहाता येथील आदर्श तलाठी श्रीकृष्ण शिरोळे, राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांमध्ये शौर्य हजारे, कृष्णा चन्ना, श्रावण ढोरमले, तनिष्का चौरे व आयुष मोरे यांचा गौरव करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

SCROLL FOR NEXT