Crop Damage
Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage In Nagar : अवकाळी पावसामुळे नगरमध्ये तेरा हजार हेक्टरवर नुकसान

Team Agrowon

Nagar Crop Damage Update : मागील तीन दिवस जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांत अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह गारपिटीने गहू, ज्वारी, हरभरा, कांदा, टोमॅटोसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.

आंबा, द्राक्ष, संत्री, मोसंबी, लिंबू फळबागांसह १३ हजार २०९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. ३३२ घरांचे अंशतः नुकसान झाले, तर लहान-मोठी नऊ जनावरे दगावली.

नगर जिल्ह्यात ७ ते ९ एप्रिलदरम्यान जिल्ह्यामधील अनेक भागात अवकाळी पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्याने आंबा, द्राक्ष, संत्री, मोसंबी, लिंबू आदी फळबागांचे मोठे नुकसान झाले.

घरांचेही नुकसान झाले. वीज कोसळल्याने काही ठिकाणी वृक्षांनी पेट घेतला, तर काही ठिकाणी जनावरे दगावली. पारनेर, नगर, कर्जत, जामखेड, नेवासे, पाथर्डी, शेवगाव, राहुरी, संगमनेर आणि राहाता तालुक्यांत नुकसान झाले.

नेवासे तालुक्यात सर्वाधिक, म्हणजे चार हजार ३०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. अकोले, श्रीरामपूर, श्रीगोंदे आणि जामखेड तालुक्यांत नुकसान झाले नाही. नेवासे ६२०, राहुरी १२५, नगर ४८ आणि कोपरगाव तालुक्यात १७ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाले आहे.

घरांचे नुकसान, जनावरांचा मृत्यू

पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात अवकाळीचा तडाखा मोठ्या प्रमाणात बसला. १५३ घरांचे नुकसान झाले. नेवासे तालुक्यातील ८१ घरांचे नुकसान झाले. शेवगाव ३०, नगर २८, संगमनेर १८, राहुरी १०, पाथर्डी ७, तर राहाता तालुक्यातील एका घराचे नुकसान झाले.

अवकाळी पावसात वीज पडणे, झाडांच्या फांद्या अंगावर पडणे आणि गोठे पडल्याने नऊ जनावरे दगावली आहेत. जामखेड, कर्जत, नेवासे आणि शेवगाव तालुक्यांत प्रत्येकी एका मोठ्या जनावराचा मृत्यू झाला. नगर तालुक्यातील लहान पाच जनावरांचा मृत्यू झाला आहे. नगर ३, नेवासे २ आणि शेवगावमधील २ अशा ७ गोठ्यांचे नुकसान झाले.

तालुकानिहाय बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये)

नगर - १ हजार २२६, कर्जत १५६, कोपरगाव ४१४, नेवासे ४ हजार ३००, पारनेर २ हजार ४००, पाथर्डी २.८, राहुरी ६९८, संगमनेर ६००, शेवगाव २ हजार १९७, राहाता ४०५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

Agriculture Success Story : नैसर्गिक उमाळ्यावर फुलली शेती, बहरले पर्यटन

Horticulture : ‘कोठली’ला मिळाला बागायती चेहरा

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

SCROLL FOR NEXT