Crop Damage Compensation : मराठवाड्यातील नुकसानग्रस्तांना ८४ कोटी वितरणाची मंजुरी

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत १ लाख २२ हजार १८ शेतकऱ्यांच्या ६०४०२.४४ हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकाचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अहवाल शासन दरबारी देण्यात आला होता.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ४ ते १९ मार्च दरम्यान अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी ८४ कोटी ७५ लाख १९ हजार रुपये निधी वितरणाला शासनाने मंजुरी दिली आहे. अर्थात, कागदावर असलेला ही मदत निधी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या खात्यावर कधी जमा होणार हा प्रश्‍न आहे.

मराठवाड्यातील शेतीवरील संकट संपण्याची नाव घेताना दिसत नाहीत. अतिपावसाने खरीप हातचा गेला. रब्बीतही संकटाची मालिका कायम राहिली आणि आता काढणीला आलेल्या रब्बीसह उन्हाळी पिकावरही अवेळी पावसासह गारपिटीचे संकट घोंघावते आहे.

४ ते १९ मार्च २०२३ दरम्यान अवेळी झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती सर्व विभागीय आयुक्तांकडून विहित नमुन्यात शासनाने मागितली होती.

त्यानुसार मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत १ लाख २२ हजार १८ शेतकऱ्यांच्या ६०४०२.४४ हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकाचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अहवाल शासन दरबारी देण्यात आला होता.

Crop Damage
Crop Loss : पावसामुळे शेतकरी संकटात, बहुतांश पिकांचं नुकसान

त्यानुसार प्रचलित दराप्रमाणे नुकसान भरपाई देण्यासाठी ८४ कोटी ७५ लाख १९ हजार रुपयांचा निधी आवश्यक असल्याचे विभागीय आयुक्तांकडून कळविण्यात आले होते.

प्राप्त अहवालावरून, राज्य शासनाने १० एप्रिलच्या शासन निर्णयानुसार मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसाठी ८४ कोटी ७५ लाख १९ हजार रुपये निधी वितरणाला मंजुरी दिली आहे.

राज्यातील २ लाख २५ हजार १४७ शेतकऱ्यांच्या १ लाख १३ हजार ४०२ हेक्टरवरील नुकसान झालेल्या क्षेत्राच्या भरपाईसाठी याच शासन निर्णयात १७७ कोटी ३९ लाख ९१ हजार रुपये निधी वितरणाला मंजुरी देण्यात आली आहे.

६ ते १९ मार्च दरम्यान जिल्हानिहाय बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये)

जिल्हा - शेतकरी - बाधित क्षेत्र

छत्रपती संभाजीनगर - ३५०१५ - १३५३५

जालना - ४२१५ - १९६९. ४९

परभणी- ५९९ - ३९६०.८१

हिंगोली - ६,५२६ - ३८३८.७२

नांदेड- ३६५४३ - २१५७९.५०

बीड - ८५०३ - ३८०२.०२

लातूर - २२५६५ - १०३६७.८३

धाराशिव - २६५२ - १३४९

Crop Damage
Flood Drought loss: पूर आणि दुष्काळामुळे ७० दशलक्ष सुपीक जमीन गमावली

जिल्हानिहाय वितरणाला मंजुरी मिळालेला निधी

छत्रपती संभाजीनगर - २२ कोटी १७ लाख ४१ हजार

जालना - ३ कोटी ६७ लाख ८८ हजार

परभणी - ४ कोटी ३७ लाख ४७ हजार

हिंगोली - ६ कोटी ४ लाख ४९ हजार

नांदेड - ३० कोटी ५२ लाख १३ हजार

बीड - ५ कोटी ९९ लाख ९९ हजार

लातूर - १० कोटी ५६ लाख ५५ हजार

धाराशिव - १ कोटी ३९ लाख २७ हजार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com