Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Crop Insurance : रब्बी पीकविम्याची तेरा हजारांवर शेतकऱ्यांना प्रतीक्षा

Farmer Relief Fund : हिंगोली जिल्ह्यातील तब्बल १३ हजार १०५ शेतकरी पीकविम्याच्या प्रतीक्षेत आहेत.

Team Agrowon

Hingoli News : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत २०२३ च्या रब्बी हंगामातील स्थानिक नैसर्गिक आपत्ती तसेच काढणीपश्‍चात नुकसान या जोखीम बाबी अंतर्गंत शेतकऱ्यांनी केलेल्या विमादावे अर्जावर (पीक नुकसान पूर्वसूचना) पीकविमा कंपनीकडून अद्याप निर्णय प्रलंबित आहे. हिंगोली जिल्ह्यातील तब्बल १३ हजार १०५ शेतकरी पीकविम्याच्या प्रतीक्षेत आहेत.

२०२३ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान पीकविमा योजनेत हिंगोली जिल्ह्यातील २ लाख ३ हजार ५०९ शेतकऱ्यांनी हरभरा, गहू, ज्वारी आदी मिळून एकूण १ लाख ५४ हजार ५५ हेक्टरवरील पिकांसाठी ३० कोटी ६७ लाख रुपये एवढ्या रकमेचे पीकविमा संरक्षण घेतले होते.

नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात जिल्ह्यातील अनेक मंडलांत अतिवृष्टी झाली. नाले, नद्यांला पूर आले. हरभरा तसेच अन्य पिके पाण्याखाली गेली. हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ज्वारी, गहू, करडई आदी पिकांचे नुकसान झाले.

स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखीम बाबीअंतर्गत पीकविमा भरपाई मिळावी यासाठी विमाधारक शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे विविध माध्यमांतून ५ हजार ८७७ पूर्वसूचना अर्ज दाखल केले तर काढणीपश्‍चात नुकसान या जोखीम बाबीअंतर्गत ७ हजार २२८ असे एकूण १३ हजार १०९ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले. परंतु या अर्जाच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई देण्याबाबत विमा कंपनीने निर्णय घेतलेला नाही, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

हिंगोली जिल्हा रब्बी हंगाम पीकविमा स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)

तालुका शेतकरी विमा

संरक्षित क्षेत्र स्थानिक

आपत्ती अर्ज काढणी पश्‍चात नुकसान अर्ज

हिंगोली १६३९६ १३८७९ २९७ ३९९

कळमनुरी ४४१८० ३९१६१ २३१२ ३७२३

वसमत ५०८३८ ३३७५० ९८० २१७

औंढानागनाथ ५०१७८ ३३६९३ १८८० २५५३

सेनगाव ४१९१७ ३३५७२ ४०८ ३३६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop Damage : सोयाबीनच्या शेंगा झाडावरच वाळू लागल्या

Mumbai APMC : मुंबई बाजार समितीमध्ये साचले कचऱ्याचे ढीग

Ration Card e-KYC : दोन लाख ८७ हजारांवर लाभार्थी स्वस्त धान्यास मुकण्याची शक्यता

Boragaon Anjanpur Barrage : बोरगाव-अंजनपूर बॅरेजेच्या दुरुस्तीला चौदा कोटी

Sugarcane Crushing Season : कर्नाटकात जाणाऱ्या उसाबाबत तोडगा काढू

SCROLL FOR NEXT