Congress BJP Agrowon
ॲग्रो विशेष

Amaravati Constituency : अमरावतीत यंदा रंगणार नाही भाजप विरुद्ध काँग्रेस सामना

Maharashtra Assemble Election 2024 : अमरावती विधानसभा मतदार संघात यंदा तिहेरी लढतीचे चित्र भाजपच्या माजी आमदार जगदीश गुप्ता यांनी शड्डू ठोकल्याने सध्या निर्माण झाले आहे.

Team Agrowon

Amaravati News : अमरावती विधानसभा मतदार संघात यंदा तिहेरी लढतीचे चित्र भाजपच्या माजी आमदार जगदीश गुप्ता यांनी शड्डू ठोकल्याने सध्या निर्माण झाले आहे. अद्याप जागावाटप झाले नसले तरी या मतदार संघात पारंपरिक काँग्रेस विरुद्ध भाजप, असा सामना रंगणार नसून महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी, अशी लढत बघायला मिळणार आहे.

महायुतीकडून आमदार सुलभा खोडके तर ‘मविआ’कडून डॉ. सुनील देशमुख रिंगणात राहण्याच्या प्रयत्नात आहेत. असे झाले तर गुप्तांच्या एन्ट्रीने तिहेरी लढत होईल. विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला असला तरी महायुती व महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे घोंगडे अडले आहे.

जागावाटप होत नसल्याने इच्छुकांची मात्र धडधड वाढली आहे. त्यांनी जोरदार लॉबिंग सुरू केले असले तरी काहीजण मात्र निश्चिंत आहेत. विशेषतः विद्यमान आमदारांना उमेदवारी निश्चित असल्याचा विश्वास आहे. त्यांनी मतदारसंघात कॉर्नर बैठकींचे सत्र सुरू केले आहे.

अमरावती मतदार संघात महाविकास आघाडीकडून डॉ. सुनील देशमुख तर महायुतीकडून आमदार सुलभा खोडके उमेदवार राहतील. अशातच भाजपचे माजी आमदार जगदीश गुप्ता यांनीही शड्डू ठोकून यंदा तिहेरी लढतीचे चित्र सध्या निर्माण केले आहे.

सत्तांतरानंतर निवडणुका या एका पक्षापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. आघाडी व युतीचे राजकारण प्रारंभ झाले आहे. त्यामुळे आघाडी व युतीतील कोणत्यातरी एका पक्षाच्या उमेदवारास रिंगणात उतरविण्यात येणार आहे. पूर्णतः शहरी मतदार संघ असलेल्या अमरावती मतदार संघात येणाऱ्या महापालिकेत भाजपचे वर्चस्व होते तर वर्ष २०१४ व १९९९ तसेच १९९० च्या निवडणुका वगळता भाजपला या मतदार संघात यश मिळालेले नाही.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतांचे ध्रुवीकरण करण्याचा भाजपने २०१९ पासूनच प्रयत्न केला आहे. मात्र महायुतीत ही जागा सोडण्याची वेळ आल्याने यंदा निवडणुकीच्या आखाड्यात भाजपचा उमेदवार राहण्याची शक्यता जवळपास मावळली आहे.

वर्षानुवर्षे पक्ष संघटनेत काम करणारे पदाधिकारी व कार्यकर्ते यामुळे दुखावले असले तरी पक्षशिस्तीसमोर त्यांना नमते घेण्याची वेळ येईल, अशी अधिक शक्यता आहे. त्यामुळेच पडद्याआडून जगदीश गुप्ता यांची उमेदवारी पुढे ढकलण्यात येऊ लागली आहे, अशी चर्चा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement Center : कोरेगावात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू

Sugarcane Farming : शाहूवाडी परिसरात खुंटली आडसाली उसाची वाढ

Dairy Farming : दुग्ध व्यवसाय प्रत्येक शेतकऱ्याचा मोठा आधार

Water Crisis : ‘मोरणे’चे पात्र पडू लागले कोरडे

Achalpur APMC : अचलपूर बाजार समिती देणार व्यापाऱ्यांना ओळखपत्र

SCROLL FOR NEXT