Department Of Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department Malfeasance : बदल्या, पदोन्नत्यांमध्ये गैरव्यवहार झाला नाही

Team Agrowon

Pune News : माझ्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात कृषी विभागातील बदल्या व पदोन्नत्यांमध्ये गैरव्यवहार झालेला नाही. या बाबतचे निर्णय सामान्य प्रशासन विभागाचे नियमांचे पाळून व आवश्यक तेथे मुख्यमंत्र्यांच्या संमतीने घेतले गेले होते, असा जोरदार युक्तिवाद सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी केला आहे.

कृषी खात्यात झालेल्या बदल्यांमध्ये भुसे यांनी अधिकाऱ्यांच्या संगनमताने गैरव्यवहार केल्याची तक्रार लोकायुक्तांकडे आलेली आहे. या बाबत लोकायुक्तांनी तत्कालीन कृषिमंत्री म्हणून दादा भुसे यांना नोटीस होती.

आरोपासंदर्भात उत्तर देण्यासाठी श्री. भुसे यांना सहा आठवड्यांची मुदत देण्यात आली होती. श्री. भुसे यांनी लोकायुक्तांसमोर प्रत्यक्ष हजर न होता त्यांचे म्हणणे लेखी स्वरूपात सादर केले आहे.

‘‘माझ्यावर झालेल्या आरोपांच्या तक्रारींबाबत कृषी विभागाने यापूर्वीच एक अहवाल दिला आहे. या अहवालाशी मी सहमत आहे. मी घेतलेले निर्णय चुकीचे नाहीत. संबंधित विभागाचा प्रशासकीय प्रमुख व मंत्री तथा सक्षम प्राधिकारी म्हणून मला प्राप्त असलेल्या अधिकारांमध्येच मी निर्णय घेतले होते. कायदेशीर तरतुदींचे पालन करीत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या केलेल्या आहेत. काही ठिकाणी सक्षम प्राधिकारी म्हणून मुख्यमंत्र्यांची मंजुरी घेऊन कार्यवाही केली आहे,’’ असे श्री. भुसे यांनी लोकायुक्तांना सांगितले आहे.

अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदलीने पदस्थापना अथवा पदोन्नती वेळेस वाटप करण्यात आलेल्या विभागांमध्ये बदल करण्यात आलेला नाही. परंतु क्षेत्रीय स्तरावर मी दौरे करतो. त्यावेळी निदर्शनास आलेली प्रशासकीय निकड, कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक अडचणी, त्यांच्याकडून होत असलेली विनंती याचा विचार करीत नागरी सेवा मंडळाच्या शिफारशींमध्ये आवश्यक ते बदल केले गेले व त्याच विभागात पदस्थापना देण्याचा निर्णय घेण्यात आला.

बदल्यांच्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाच्या निकषानुसार कालावधी पूर्ण केलेल्या व वैद्यकीय कागदपत्रे सादर केलेल्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना त्यांच्या सोयीसाठी विभाग बदलासाठी मान्यता दिली होती, असाही दावा श्री. भुसे यांनी केला आहे.

तक्रारीत काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गैरव्यवहार केल्याचे सांगत त्यांची नावे नमूद करण्यात आलेली आहेत. श्री. भुसे यांनी या बाबत असा युक्तिवाद केला, की आरोप झालेले संबंधित अधिकारी व कर्मचारी मंत्री कार्यालयातील आस्थापनावर प्रतिनियुक्तीने आलेले व काही कृषी विभागात कार्यरत आहेत.

संबंधित अधिकारी व कर्मचारी शासनाच्या वतीने तसेच मंत्री कार्यालयाच्या वतीने शासकीय कामाचा भाग म्हणून विविध विषयांच्या संचिका हाताळतात. तसे करताना ते कायदेशीर तरतुदींचे पालन करीत होते. शासनाने ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीनुसार ते कामकाज करीत होते.

कृषी खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना सामान्य प्रशासन विभागाने ठरवून दिलेल्या निकषांचे पालन करण्यात आलेले आहे. मला प्राप्त असलेल्या अधिकारातच तसे निर्णय घेतले आहेत. या बाबत कृषी विभागाने आपल्याकडे अहवाल दिला आहे. त्याचे अवलोकन तुम्ही करावे, अशी विनंती श्री. भुसे यांनी लोकायुक्तांना केली आहे.

तक्रारदार राजकीय पक्षाचा लोकायुक्तांसमोर केलेल्या युक्तिवादात मंत्री दादा भुसे यांनी संबंधित तक्रारदार राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे नमूद केले आहे. ‘‘तक्रारदाराने राजकीय आकसापोटी माझ्यावर मोघम आरोप केले आहेत. त्यामुळे ही तक्रार निकाली काढावी,’’ अशी मागणीदेखील भुसे यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Modi In Wardha : मोदींच्या हस्ते अमरावतीतील टेक्स्टटाईल पार्कचं भूमिपूजन; कापूस उत्पादकांना होणार फायदा?

Cotton Bollworm : गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी कीटक मिलन व्यत्यय तंत्रज्ञान

Sericulture : रेशीम शेतीसाठी तुतीच्या सुधारित जाती

Vegetables Market : कोल्हापूर बाजारात टोमॅटो दरात वाढ; कोथिंबीरचे अचानक दर घसरले, कांद्याची आवक वाढली

Water Conservation : जलसंधारणासह जयपूरची पर्यावरणात आघाडी

SCROLL FOR NEXT