Sugar Mill Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Mill : भाऊरावच्या कारखान्याच्या सभासद नोंदणीत भेदभाव नको

Bhaurao Chavan Cooperative Sugar Factory : भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने नवीन सभासद नोंदणी सुरु केली आहे.

Team Agrowon

Nanded Sugar Factory News : भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने नवीन सभासद नोंदणी सुरु केली आहे. कारखान्याने नवीन सदस्य नोंदणीत पक्षपातीपणा न करता नियमित ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना सभासद करून घ्यावे, असे आवाहन ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य तथा शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी मुख्य प्रवर्तक अशोक चव्हाण यांना केले आहे.

भोकर मतदारसंघातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी नेहमीच अशोक चव्हाण यांना साथ दिली. सर्व विरोधकांनीही कारखान्याच्या बाबतीत कधीही राजकारण केले नाही.

सध्या कारखान्याच्या जुन्या सभासदांचे शेअर्स दहा हजारांवरून पंधरा हजार रुपये केले जात आहे. त्याच सोबत नवीन सभासद नोंदणी ही सुरू आहे. यात सोयीच्या लोकांना सभासद करून घेण्यात येत आहे.

अनेक गावच्या शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक डावल्या जात असल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत. भाऊराव कारखान्याचे मुख्य प्रवर्तक अशोक चव्हाण यांना भाऊरावच्या कार्यक्षेत्रातील सर्वपक्षीय शेतकऱ्यांनी आतापर्यंत सहकार्य केले केले आहे.

अनेक गावातील कॉंग्रेस कार्यकर्ते त्यांच्या व्यक्तिगत विरोधकांना सभासद होण्यापासून दूर ठेवत आहे. त्यांच्याबद्दल कारखाना प्रशासनाला हे विरोधक आहेत म्हणून चुकीची माहिती देत आहेत. अशोक चव्हाण यांनी नियमित ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांना सभासद करून घ्यावे, असे आवाहन श्री इंगोले यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Harvesting: खानदेशात ऊस तोडणीला गती

Aliv Farming: चिवरा शिवारात आळीव लागवड

Sugarcane Crisis: माजलगावात उसाला तुरे; शेतकरी कारखान्यांच्या उंबरठ्यावर

Aravalli Hills Conservation: म्हाताऱ्या पर्वताला वाचविण्यासाठी झटणारा शेतकरी

Women International Year 2026: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष केवळ उत्सव की खरी मान्यता?

SCROLL FOR NEXT