Crop Survey Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Survey : उष्णतेने केळीच्या नुकसानीचे अद्याप पंचनामे नाहीच

Survey Update : खानदेशात उष्णतेत केळीची मोठी हानी झाली आहे. काही भागांत अंशतः नुकसान आहे. परंतु याबाबत कृषी यंत्रणा अद्यापही बांधावर पोचून सर्वेक्षण, पाहणी करायला तयार नाहीत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात उष्णतेत केळीची मोठी हानी झाली आहे. काही भागांत अंशतः नुकसान आहे. परंतु याबाबत कृषी यंत्रणा अद्यापही बांधावर पोचून सर्वेक्षण, पाहणी करायला तयार नाहीत. यंत्रणा निवडणुकीच्या कामात असल्याचे सांगून कृषी यंत्रणा शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही शेतकरी करीत आहेत.

खानदेशात उष्णतेने या महिन्यात नवनवे विक्रम केले आहेत. रोज तापमानात वाढ झाली. काही भागांत कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसवर होते. मोठ्या केळी बागा अतिउष्णतेने अनेक भागात कोसळल्या आहेत.

झाडे मोडून पडली. तसेच उष्णतेमुळे घड सटकून पडले. यात संबंधित झाडाचे १०० टक्के नुकसान झाले. कृषी विभागातील मंडळी मात्र निवडणुकीच्या कामात असल्याचे सांगितले जाते. कुणी कर्मचारी तालुका कृषी विभागात सकाळी व दुपारी सापडत नाही.

यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी कायम आहेत. जळगाव, चोपडा, रावेर, यावल, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, नंदुरबार, तळोदा आदी सर्वच तालुका कृषी कार्यालये दुपारी ओस पडतात.

फळ पीकविमा योजनेचा घोळ

२०२३-२४ मध्ये जळगाव जिल्ह्यात सुमारे ५७ हजार शेतकऱ्यांनी केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतले आहे. परंतु यातील किती शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झाले, किती नामंजूर झाले, याची माहिती कृषी विभाग, विमा कंपनी देत नाही. थंडीतही केळीची हानी झाली होती. परंतु कमी तापमासंबंधीच्या नुकसानीत किती व कुठल्या भागातील शेतकऱ्यांना २०२३-२४ संबंधीच्या वर्षासाठी परतावे मिळणार हेदेखील विमा कंपनी, शासन सांगत नसल्याची स्थिती आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Rainfall : नांदेड जिल्ह्यात आजवर १८४ मिलिमीटर पावसाची तूट

South Solapur Water Crisis : उशाशी भीमा-सीना नद्या असूनही दक्षिण सोलापूर कोरडा ठणठण

Soybean Crop Damage: शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न करपले

Jalna Zilla Parishad Schools: पुढील दोन वर्षांत ५०० जिल्हा परिषद शाळांचा विकास करा : पालकमंत्री पंकजा मुंडे

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

SCROLL FOR NEXT