Raju Shetti Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Loan Waive : कर्जमुक्‍तीशिवाय आता माघार नाही

Raju Shetti : देशात तसेच राज्यात होणाऱ्या आत्महत्या या शासनाच्या धोरणाचाच परिपाक आहे. त्यामुळे शासनानेच त्याच्या नियंत्रणासाठी सात-बारा कोरा करण्यासारख्या उपाययोजना राबविण्याची गरज आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Yavatmal News : देशात तसेच राज्यात होणाऱ्या आत्महत्या या शासनाच्या धोरणाचाच परिपाक आहे. त्यामुळे शासनानेच त्याच्या नियंत्रणासाठी सात-बारा कोरा करण्यासारख्या उपाययोजना राबविण्याची गरज आहे.

त्यासाठीची चळवळ सोमवारी (१ जुलै) कृषिदिनी (कै.) वसंतराव नाईक यांच्या जन्मगावापासून सुरू करण्यात आली आहे. सात-बारा कोरा झाल्याशिवाय आता माघार नाही, असा इशारा माजी खासदार तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला.

(कै.) वसंतराव नाईक यांचे जन्मगाव असलेल्या गहुली येथून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वसंतराव नाईक कर्जमुक्‍ती अभियानाची सुरुवात करण्यात आली. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. श्री. शेट्टी पुढे म्हणाले, ‘‘सरकार हमीभाव कमी मिळाल्यास उत्पादकता वाढविण्यास सांगते. मात्र त्याचवेळी उत्पादकता खर्चही वाढतो.

सरकारने निविष्ठांच्या बाबतीत शेतकऱ्यांना परावलंबी केले. देशी वाण संपले त्यामुळे शेतकऱ्यांची हंगामापूर्वी बाजारावरावरील अवलंबिता वाढली आहे. निविष्ठांचे दर सातत्याने वाढले. सोबतच डिझेलच्या दरातही वाढ करून मशागतही महाग केली.

व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ययाती नाईक, डॉ. प्रकाश पोफळे, गहुलीचे सरपंच नितीन कोल्हे, उपसरपंच विलास आडे, पोलिस पाटील शरद राठोड, आदित्य नाईक, स्वाभिमानीचे प्रदेश प्रवक्‍ता मनीष जाधव, हरीविजय राठोड, प्रेमराव सरगर, धीरज पांडे, विश्‍वजित लांडगे, रूपेश जाधव यावेळी उपस्थित होते.प्रियांका सुदर्शन राठोड, वर्षा संजय म्हस्के या दोन आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील महिलांचा या वेळी साडीचोळी देऊन सन्मान करण्यात आला.

कर्जमाफी सहज शक्‍य

सरकारचे रोजचे जीएसटी संकलन १ लाख ७५ हजार रुपये आहे. इतके प्रचंड संकलन हे सामान्यांच्या खिशातूनच होते. त्यामुळे याच पैशातून सहज कर्जमाफी शक्‍य आहे. धनदांडग्यांचे उद्योग अवसायनात निघाले म्हणून सरसकट त्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला जातो. शेतकरी देखील देशासाठी अन्नधान्याचे उत्पादन घेतो.

नैसर्गिक कारणामुळे उत्पादन न झाल्यास त्यालाही कर्ज भरणे शक्‍य होत नाही. परिणामी त्याचेही कर्ज माफ करावे, अशी मागणी या वेळी राजू शेट्टी यांनी केली. देशातील शेतकऱ्यांना रासायनिक खताची सहज उपलब्धता व्हावी याकरिता लालबहाद्दूर शास्त्रीपासून खतावर अनुदान दिले जात आहे.

मात्र आजवर एकाही पंतप्रधानांनी खताच्या गोणीवर आपला फोटो छापून स्वतःचे कौतुक करून घेतले नाही. आता मात्र पंतप्रधानांना सर्वच ठिकाणी आपली प्रसिद्धी हवी आहे, असा टोलाही राजू शेट्टी यांनी लगावला.

असे आहे आंदोलन

निवेदन राष्ट्रपती यांच्या नावे दिले जाणार आहे. त्याचे प्रपत्र तयार करण्यात आले असून त्यातून कर्जमाफीची मागणी केली जाईल. त्यानंतरच्या काळात नेत्यांना गावबंदी व इतर आंदोलनात्मक बाबींवर भर दिला जाणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Poscast: तुरीचे भाव दबावात; सोयाबीनचे दर सुधारले; कापूस व पेरूची आवक कमी; दोडक्याला उठाव

Paddy Crop Damage: नाशिकमधील भात उत्पादक शेतकरी संकटात

Hawaman Andaj: पावसाचे वातावरण निवळण्याची शक्यता; राज्यातील अनेक भागात किमान तापमानात होतेय घट

Sugarcane Harvest: वहागावमध्ये शेतकऱ्यांकडून ऊसतोडीसाठी नियमावली

Kolhapur Sugar Factory: 'बिद्री' पाठोपाठ भोगावती कारखान्याकडून सर्वाधिक ऊसदर जाहीर, 'एफआरपी'पेक्षाही अधिक

SCROLL FOR NEXT