Maratha Reservation Agrowon
ॲग्रो विशेष

Maratha Reservation : अधिवेशनात मराठा आरक्षणाची शक्यता नाही

बाळासाहेब पाटील

बाळासाहेब पाटील/ ॲग्रोवन वृत्तसेवा
Ajit Pawar : नागपूर : ‘
‘मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी बिहारच्या धर्तीवर राज्यातही आरक्षणाची मर्यादा वाढविण्याचा पर्याय राज्य सरकारपुढे आहे. मात्र, या अधिवेशनात असा निर्णय होईल, असे वाटत नाही,’’

असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (ता.१२) मांडले. तसेच मध्य प्रदेश, राजस्थानच्या धर्तीवर राज्यातही काही आमदारांना तिकीट देण्याच्या पर्यायावर चर्चा सुरू असल्याचेही ते म्हणाले.

ते म्हणाले, ‘‘मराठा समाजाला अन्य कोणाचे आरक्षण कमी न करता आरक्षण देण्याची राज्य सरकारची भूमिका आहे. सर्वपक्षीय बैठकीतही तसाच निर्णय घेण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील हे मात्र मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मागत आहेत. बिहार सरकारने कायदा करून आरक्षणाची टक्केवारी वाढविली आहे. तशी आपल्यालाही राज्यात दहा ते बारा टक्के आरक्षण वाढविता येऊ शकते.

छगन भुजबळ यांची ओबीसीबाबतची भूमिका ही आजची नाहीतर मंडल आयोगापासूनची आहे. त्यांनी यापूर्वी ओबीसींचे देशभर मेळावे घेतले आहेत. त्यामुळे त्यांना आपली भूमिका घेण्याचा अधिकार आहे. मनोज जरांगे पाटील यांनाही त्यांचे म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे.’’

‘सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणार’
सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यावर निर्णय घेतला जाईल, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली. यापूर्वी देवेंद्र फडणवीस हेच नाहीतर मी देखील जुन्या पेन्शनच्या विरोधात होतो. मात्र, आजकालची मुले म्हातारपणी आई-वडिलांना सांभाळात नाहीत. म्हातारपणी त्यांना एकटे राहावे लागते.

अशा वेळी त्यांच्या उपजीविकेची सोय हवी. केंद्र सरकारही जुनी पेन्शन योजना लोकसभा निवडणुकीपूर्वी लागू करण्याच्या तयारीत आहेत. राज्य सरकारने जुनी पेन्शनबाबत नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल प्राप्त झाला असून लवकरच राज्य सरकार त्यावर निर्णय घेईल, असेही अजित पवार म्हणाले.

‘ते या वयातही फिरतात, त्याला मी काय करू’
अजित पवार यांच्या या वक्तव्याचा धागा पकडून घरातील ८४ वर्षे वयाच्या व्यक्तीला एकटे सोडून पक्ष सोडणे किती योग्य आहे, असा सवाल त्यांना केला असता ‘८४ वर्षे वयाच्या व्यक्तीला आम्ही आता त्रास घेऊ नका.

तुम्ही घरात बसा. मी सर्व सांभाळतो, असे सांगत होतो. पण तेच ऐकत नाहीत. या वयातही फिरत बसतात, तर मी तरी काय करू,’’ असा टोला अप्रत्यक्षरीत्या अजित पवारांनी शरद पवारांना लगावला.

काही खासदारांना तिकिटे
मध्य प्रदेशामध्ये काही खासदारांना विधानसभा निवडणुकीची उमेदवारी दिली होती. तोच पॅटर्न महाराष्ट्रात महायुती राबविणार का, असे विचारले असता, असा या बाबतीत अजून काही निर्णय झालेला नाही. काही आमदारांना तिकिटे मिळू शकतात. त्यावर आमच्यात चर्चा सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT