Solapur News : जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करावी, अन्यथा १४ डिसेंबरपासून बेमुदत संप करण्याची नोटीस कंत्राटी कर्मचारी संघटनेने राज्य सरकारला दिली आहे.राज्य सरकारी कर्मचारी मध्यवती संघटना, महाराष्ट्र, जिल्हा शाखा सोलापूर, शासकीय निमशासकीय समन्वय समिती, सोलापूरतर्फे ‘माझे कुटुंब, माझी पेन्शन’ या शीर्षकाखाली १८ मागण्यांच्या आग्रहासाठी उभारलेले ‘सहकुटुंब महामोर्चा’ आंदोलन करण्यात आले.
या नंतर सरकारी-निमसरकारी- शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी नगरपालिका- नगर परिषद कर्मचारी समन्वय समिती, महाराष्ट्र राज्याच्या वतीने हे निवेदन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना देण्यात आले.
या प्रसंगी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष शंतनू गायकवाड, अध्यक्ष विरूपाक्ष घेरडे, निमंत्रक अशोक इंदापुरे, अशोक जानराव, सरचिटणीस अमृत कोकाटे, किशोर साबळे, जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे विवेक लिंगराज, कंत्राटी कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन जाधव, लिपिकवर्गीय संघटनेचे अविनाश गोडसे, जिल्हाध्यक्ष दिनेश बनसोडे, संघटक राजेश देशपांडे उपस्थित होते.
एक नोव्हेंबर २००५ पासून शासकीय सेवेत आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना मिळविण्यासाठी मागील १४ ते २० मार्चपर्यंत सात दिवसांचा संप केला.
त्यानंतर सनदी अधिकारी सुबोधकुमार यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय जुनी पेन्शन योजनेच्या समितीची स्थापना १४ मार्च रोजी करण्यात आली. समितीने तीन महिन्यांत अहवाल सादर करणे अपेक्षित होते. त्यानंतर १४ ऑगस्ट २०२३ पर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. तरीही समितीचा अहवाल गुलदस्तात आहे. त्यामुळे तातडीने यावर निर्णय घ्यावा, अन्यथा आमचे आंदोलन ठरले आहे, असेही संघटनेने म्हटले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.