Dr. Shravankumar Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Technology : कापसात २५ वर्षांत नवे तंत्रज्ञानच नाही : डॉ. श्रवणकुमार

Dr. Shravankumar : भारतातही कृषी क्षेत्रात नव्या संशोधनाला प्रोत्साहन मिळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत,’’ अशी अपेक्षा राशी सीड्स कंपनीच्या जैवतंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. एम. श्रवणकुमार यांनी व्यक्‍त केली.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : ‘‘वातावरण बदलच नाही तर नजीकच्या काळात किडींची वाढलेली प्रतिकारशक्‍ती, जमिनीचा बदलता पोत, पावसाच्या पाण्यातील असमानता अशी अनेक आव्हाने पीक उत्पादन क्षेत्रात आहेत. ही आव्हाने लक्षात घेत जागतिकस्तरावरील फायदेशीर तंत्रज्ञान उपलब्धतेसह भारतातही कृषी क्षेत्रात नव्या संशोधनाला प्रोत्साहन मिळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत,’’ अशी अपेक्षा राशी सीड्स कंपनीच्या जैवतंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. एम. श्रवणकुमार यांनी व्यक्‍त केली.

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत आयोजित कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी आलेल्या डॉ. श्रवणकुमार यांनी ‘ॲग्रोवन’शी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘यापुढील काळात तंत्रज्ञानाशिवाय शेती अशक्‍य आहे. त्यामध्ये जैवतंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका राहील. इंटरनेट व ‘एआय’ अशा बाबी देखील शेती क्षेत्रावर परिणाम करतील.

त्यामुळे अशा शेतीचे व्यवस्थापन करण्यासाठी कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची देखील गरज भासेल. कापूस पिकात यापूर्वी बीजी-१ आणि बीजी-२ हे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले होते. त्यानंतर गेल्या २५ वर्षांत कापूस पिकात जैवतंत्रज्ञानाचा अभाव आहे. त्याचा देखील परिणाम व्यवस्थापन आणि पर्यायाने उत्पादकतेवर झाला आहे.’’

‘‘खासगी कंपन्यांच्या स्तरावर संशोधन आणि विकासाचे काम सुरू असले, तरी त्याला प्रशासकीय पातळीवर अपेक्षित सहकार्य मिळत नाही. त्यामुळे एकंदरीतच देशांतर्गत नव संशोधनाच्या बाबतीत नकारात्मकता आली आहे. अशातच भारतीय कृषी संशोधन परिषदेने पुढाकार घेत त्यांच्या अखत्यारितील संशोधन संस्था आणि खासगी कंपन्यांमध्ये समन्वय वाढावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

खासगी-सार्वजनिक भागीदारीचे मॉडेल त्यासाठी साकारले आहे. त्यातूनच आयसीएआर संस्थांकडील संशोधन साहित्याची उपलब्धता गरजेनुसार खासगी कंपन्यांना करता येईल. यातून निश्‍चितच भारतीय शेतीसाठी पूरक तंत्रज्ञानाची उपलब्धता होईल,’’ असा विश्‍वास डॉ. श्रवणकुमार यांनी व्यक्त केला.

हवामान बदलासह किडींची वाढती प्रतिकारशक्‍ती हे देखील आव्हान भारतीय बियाणे उद्योगासमोर आहे. कापूस उत्पादक गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव व त्यामुळे होणारे नुकसान यामुळे जेरीस येतो. ही बाब लक्षात घेता कंपनीने गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी असलेले पूरक तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला आहे. यात कंपनीला मोठे यश आले असून लवकरच हे तंत्रज्ञान भारतीय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करू.
डॉ. एम. श्रवणकुमार, प्रमुख, जैव तंत्रज्ञान विभाग, राशी सीड्स कंपनी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farmer Subcommittee: कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसाठी उपसमिती; पंधरा दिवसांच अहवाल देण्याचे आदेश

Crop Damage: मे, जूनमध्ये पावसामुळे ५६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान; कृषी विभागाची माहिती

Goras Bhandar Closure: गोरस भंडारावर कारवाई; दररोज होणाऱ्या ३ हजार ५०० लिटर दूध संकलनावर परिणाम

Offline Fertilizer Purchase: ...तोपर्यंत ऑफलाइन खत खरेदी सुरू ठेवा: शेतकरी संघटना

Banana Rate: खानदेशात केळी दर २९०० रुपयांवर

SCROLL FOR NEXT