Cashew Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Rate : काजू बी दरात सुधारणा नाहीच

Cashew Production : बदलत्या वातावरणाचा मोठा फटका काजू हंगामाला बसला असून यावर्षी ३० टक्केच उत्पादन येण्याचा अंदाज आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : बदलत्या वातावरणाचा मोठा फटका काजू हंगामाला बसला असून यावर्षी ३० टक्केच उत्पादन येण्याचा अंदाज आहे. मात्र उत्पादन कमी असून देखील काजू बी दरात सुधारणा होत नसल्यामुळे उत्पादकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

बदलत्या वातावरणाचा मोठा परिणाम यावर्षीच्या काजू हंगामावर दिसून येत आहे. यावर्षी काजूच्या इतिहासात तीन टप्प्यात झाडांना मोहोर आला. तरीदेखील अपेक्षित काजू उत्पादन येण्याची शक्यता दिसून येत नाही. मार्च संपत आला तरी बाजारपेठेत काजू बी दिसून येत नाही. यावर्षी तीस टक्केच उत्पादन येण्याचा अंदाज आहे.

ज्यावेळी काजूचे उत्पादन घटते त्यावेळी काजू बी दर वाढतात. मात्र यावर्षी उत्पादन कमी झाले तरी काजू बी दरात सुधारणा होताना दिसत नाही. काजू हंगाम सुरू झाला त्यावेळी काजूची मुख्य बाजारपेठ असलेल्या बांदा बाजारपेठेत १२६ रुपये दर होता. त्यानंतर त्यामध्ये घट होवून तो १२० रुपयांवर घसरला.

काजू बी दराबाबत विविध शेतकरी संघटनांनी आंदोलने केली. मात्र कारखानदार आणि व्यापाऱ्यांनी आंदोलनाची दखल घेतली नाही. दरात कोणतीही सुधारणा झालेली नाही. अधिकतर शेतकऱ्यांकडे वेंगुर्ला चार आणि सात जातीची बी आहे.

काही ठिकाणी गावठी बी देखील आहे. वेंगुर्ला सात जातीची बी व्यापारी काही प्रमाणात दर वाढवून खरेदी करतात. परंतु वेंगुर्ला चारचा दर मात्र ११० रुपयांवर स्थिर आहे. त्यामुळे उत्पादन कमी असून देखील काजू बी दर का वाढत नाही? असा प्रश्न उत्पादकांना पडला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

Nashik APMC: नाशिक बाजार समितीचे विभाजन रद्द करा : शिवाजी चुंभळे

Rahul Gandhi: दहा वर्षांत १५२ पेपरफुटीची प्रकरणे, तरीही एकाही दोषीला शिक्षा का नाही? राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Farmers Protest Suspend: देवगावातील ‘सरण आंदोलन’ तात्पुरते स्थगित

SCROLL FOR NEXT