Water Level Agrowon
ॲग्रो विशेष

Irrigation Project : सिंचन प्रकल्पांतील पाणीपातळीत यंदा मोठी घट

Water Level : सध्या तालुक्यातील तीन मध्यम व आठ लघू प्रकल्प मिळून एकत्रित सरासरी केवळ सुमारे ३४ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

Team Agrowon

Dhule News : यंदा भीषण दुष्काळाचे चटके आतापासूनच जाणवायला लागलेले असताना तालुक्यातील पाणी प्रकल्पातील घटती पातळीदेखील चिंताजनक आहे. सध्या तालुक्यातील तीन मध्यम व आठ लघू प्रकल्प मिळून एकत्रित सरासरी केवळ सुमारे ३४ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

यातील पाच लघू प्रकल्पांनी तळ गाठला असून, आगामी काळात पाणी जपून वापरण्याची गरज आहे, अन्यथा भीषण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. यंदा तालुक्यात मोसमी पाऊस न झाल्याने किमान परतीचा पाऊस होईल, अशी अपेक्षा होती. मात्र तोही पाऊस न झाल्याने नोव्हेंबरपासूनच पाण्याची निकड जाणवायला लागली होती.

समाधानकारक पाऊस न झाल्याने यंदा नदी-नाल्यांना पूर तर नाहीच; परंतु पात्र दोन्ही काठ भरून पाणीदेखील वाहून गेलेले नाही. अशातच सुरुवातीच्या काळात झालेल्या थोड्याफार पावसामुळे तालुक्यातील मध्यम प्रकल्प तसेच लघू प्रकल्पात पाणीसाठा वाढल्याने तालुक्यातील शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याची या पाण्यावर भिस्त होती. मात्र फेब्रुवारीच्या मध्यातच या प्रकल्पातील घटता पाणीसाठा मात्र चिंता वाढविणार आहे.

जेमतेम स्थिती

तालुक्यात प्रमुख तीन मध्यम, तर आठ लघू प्रकल्प आहेत. यातील सध्या सर्वांत मोठा मध्यम प्रकल्प असणाऱ्या पांझरा, अर्थात लाटीपाडा प्रकल्पात ४१ टक्के, जामखेली प्रकल्पात ४६ टक्के, तर मालनगाव प्रकल्पात ५५ टक्के साठा शिल्लक आहे. लघू प्रकल्पातील शेलबारी प्रकल्पात ८ टक्के, विरखेल प्रकल्पात २९ टक्के, तर बुरुडखे प्रकल्पात ४० टक्के साठा शिल्लक आहे.

उर्वरित काबऱ्याखडक, बेहेड, शेवाळी, ककाणी, कायांकडा या पाच लघु प्रकल्पांनी तळ गाठला आहे. या प्रकल्पापैकी सध्या पांझरा आणि जामखेली प्रकल्पातून आवर्तन सोडण्यात आले असल्याने तेथील पाणीसाठा घटतो आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या उन्हामुळे बाष्पीभवनातून देखील यात घट होणार आहे.

मार्चनंतर तर स्थिती आणखीन बिकट होण्याची शक्यता असून, आगामी काळातील पाण्याची गरज लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन होऊन त्याचा योग्य वापर होणे गरजेचे आहे, अन्यथा तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. यंदा तुलनेत कमी झालेल्या पावसामुळे सर्वत्रच पाणीटंचाई स्थिती आहे. तथापि, सर्वांनीच याची जाणीव ठेवत उपलब्ध पाण्याचा काटेकोर आणि जपून वापर करावा. उपलब्ध पाण्याचे नियोजन करत टंचाई स्थिती निवारणासाठी प्रशासनाचे देखील नियोजन सुरू आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Grape Crop Management: वाढत्या थंडी, आर्द्रतेमध्ये जैविक नियंत्रणावर द्या भर

Maharashtra Politics: ऊर्जावान सत्ताधारी, अवसानहिन विरोधक

Crop Insurance: विश्वास वाढवा, सहभागही वाढेल

Agriculture Theft: सीसीटीव्हीमुळे केबल चोरटे सापडले

Kidney Trafficking Case: किडनी प्रकरणात पंजाबमधून एकाला अटक

SCROLL FOR NEXT