Wheat Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Wheat Sowing : गव्हाचा पेरणी क्षेत्रात घट

Rabi Sowing Update : यंदाच्या पावसाळ्यातील कमी पर्जन्यमानामुळे सिंचनासाठी पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे परभणी, हिंगोली जिल्ह्यातील गव्हाच्या पेरणी क्षेत्रात घट झाली आहे. या दोन जिल्ह्यात शुक्रवार (ता. १५) पर्यंत ४५ हजार ३९३ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे.

Team Agrowon

Parbhani News : यंदाच्या पावसाळ्यातील कमी पर्जन्यमानामुळे सिंचनासाठी पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे परभणी, हिंगोली जिल्ह्यातील गव्हाच्या पेरणी क्षेत्रात घट झाली आहे. या दोन जिल्ह्यात शुक्रवार (ता. १५) पर्यंत ४५ हजार ३९३ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे.

परभणी जिल्ह्याच्या सरासरी पर्जन्यमानात ३२ टक्केहून अधिक पावसाची तुट आहे.परिणामी जिल्ह्यातील बहुतांश भागातील विहिरींच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झालेली नाही. लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पातून आवर्तने नाहीत.

त्यामुळे गहू पिकाच्या गरजेएवढे पाणी उपलब्ध नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना गव्हाची पेरणी करता आलेली नाही. परभणीत गव्हाचे क्षेत्र ३९ हजार ३०८ आहे. शुक्रवार (ता.१५) पर्यंत १३ हजार ८७६ हेक्टर (३५.३० टक्के)पेरणी झाली.

हिंगोलीतील अनेक भागात गव्हासाठी आवश्यक पाणी उपलब्ध नाही. हिंगोली जिल्ह्यात गव्हाचे सरासरी क्षेत्र गव्हाची ४२ हजार ५०५ आहे. ३१ हजार ५१७ हेक्टर (७४.१५टक्के) पेरणी झाली आहे. सेनगाव तालुक्यात गव्हाची सरासरीपेक्षा जास्त पेरणी झाली आहे. अन्य चार तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पेरा आहे. गव्हाच्या पेरणीची वेळ निघून गेली आहे.

यंदा थंडीचा कालावधी कमी झाला आहे. त्यामुळे गव्हाच्या उत्पादनात घट येऊ शकते. सिंचन स्रोतांतील पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन अनेक शेतकऱ्यांनी घरच्या गरजेपुरतीच गव्हाची पेरणी केली आहे.

तालुकानिहाय गहू पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये)

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

परभणी १२००० १४०४४ ७०.२२

जिंतूर ४८२९ १२५८ २६.०५

सेलू ४३४८ २२०८ ५०.७८

मानवत २३४९ १७८५ ७५.९८

पाथरी २७२१ १९८९ ७३.०९

सोनपेठ १४१६ ६०० ४२.३६

गंगाखेड २७८२ ७१० २५.५२

पालम २५६२ ९६० ३७.४९

पूर्णा ६३०० १७२८ २७.४३

हिंगोली ६६८२ ५५७६ ८३.४५

कळमनुरी १०२०३ ६९८५ ६८.४६

वसमत १५९६४ १०२३१ ६४.०९

औंढा नागनाथ ६१९८ ४९५० ७९.९०

सेनगाव ३४६० ३७७५ १०९.०८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT