Bridge Work Agrowon
ॲग्रो विशेष

Bridge Work : बेहडी नदीवरील पुलाचे काम सुरू

River Bridge : शहरातील संभाजीनगर (गावठाण) ते फुलामाता चौक या भागाला जोडणारा शनी मंदिर जवळील पुलाच्या कामाला सुरवात झाली असून येथील नागरिकांची जीवघेण्या वाहतूकीपासून सुटका होणार आहे.

Team Agrowon

Kalwan News : शहरातील संभाजीनगर (गावठाण) ते फुलामाता चौक या भागाला जोडणारा शनी मंदिर जवळील पुलाच्या कामाला सुरवात झाली असून येथील नागरिकांची जीवघेण्या वाहतूकीपासून सुटका होणार आहे. पुलाचे काम सुरु झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

कळवण शहरालगत असलेल्या जुने गावठाण व आताचे संभाजी नगर या भागाला जोडणारा बेहडी नदीवरील पुलावर कळवण, नाशिक रस्त्यावर मोठी वाहतूक असल्याने संभाजीनगर भागातील रहिवासी तसेच शाळकरी मुले व महिला यांना मोठ्या प्रमाणात जीवघेणा प्रवास करावा लागत होता.

यामुळे संभाजीनगर येथील रहिवासी यांनी आमदार नितीन पवार व नगराध्यक्ष कौतिक पगार यांच्याकडे संभाजीनगर कळवण शहराला जोडण्यासाठी स्वतंत्र पुलाची मागणी केली होती. याबाबत नितीन पवार यांच्या निधीतून शनी मांदिर जवळील बेहडी नदीपात्रात पुलास मंजुरी मिळून दिल्याने प्रत्यक्ष कामकाज सुरवात झाली आहे.

संभाजीनगर परिसरातील नागरिकांना नाशिक, कळवण रस्त्यावरील पुलावरून ये-जा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत होती. आता शनीमंदिर जवळील पुलास मंजुरी मिळाल्याने आमचा प्रश्‍न सुटणार आहे.
- छगन सोनवणे, रहिवासी
नागरिकांची अडचण ओळखून शनी मंदिरजवळील पुलासाठी दोन कोटी रुपये मंजूर करून दिले असून पुलाचे काम सुरू आहे.
-नितीन पवार, आमदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief Proposal: दुष्काळ निवारणासाठी ३५ हजार कोटींचा प्रस्ताव

Konkan Weather Update: कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा कायम

Ahilyanagar Market Update : अहिल्यानगरच्या बाजारपेठेत तेजी! रताळे, बटाट्यासह पालेभाज्यांना ग्राहकांची मोठी मागणी

Cattle Fodder Camps : पशुधनाचा जीव टांगणीला! चारा छावण्यांबाबत सरकारनं तातडीने निर्णय घ्यावा; बाळासाहेब थोरातांची मागणी

Fodder Management : दुष्काळाचे संकट! पशुधनाला वाचवण्यासाठी करा चारा-पाण्याचे असे अचूक नियोजन

SCROLL FOR NEXT