Balasaheb Thorat Agrowon
ॲग्रो विशेष

Balasaheb Thorat : निळवंडेच्या केलेल्या कामाचे समाधान मिळतेय

Nilvande Dam : निळवंडे धरण व डाव्या आणि उजव्या कालव्यांच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करून सरकारकडून वेळोवेळी निधी मिळवला.

Team Agrowon

Nagar News : निळवंडे धरण व डाव्या आणि उजव्या कालव्यांच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करून सरकारकडून वेळोवेळी निधी मिळवला. अनेक अडचणींवर मात करून पूर्ण केलेले धरण आणि दोन्ही कालव्यांमधून आलेले पाणी हे पुढील अनेक पिढ्या समृद्ध करणारे असून केलेल्या कामाचे समाधान आहे, असे मत माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे शनिवारी (ता. ३) आमदार थोरात यांच्या हस्ते निळवंडेच्या उजव्या कालव्याचे जलपूजन झाले. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, ॲड. माधवराव कानवडे, आर. बी. राहणे, उत्तमराव घोरपडे, गणपतराव सांगळे, रामदास पाटील वाघ, रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे, डॉ. प्रमोद पावसे, तानाजी आहेर, नानासाहेब खर्डे, विजय राहणे, कैलास पानसरे, सुभाष गुंजाळ, रमेश गुंजाळ आदींसह पंचक्रोशीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

आमदार थोरात म्हणाले, की सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी चिंचोली गुरव येथे घेतलेल्या पाणी परिषदेतून निळवंडे येथे धरणाचा निर्णय झाला. या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला. आपण १९९९ मध्ये पाटबंधारे राज्य मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने कामाला गती मिळाली. अनेक अडचणींतून सातत्याने या कामासाठी निधी उपलब्ध केला. धरणाबरोबर डाव्या आणि उजव्या कालव्याचे काम आपणच मार्गी लावले.

खरे तर महाविकास आघाडी सरकार असते तर ऑक्टोबर २२ मध्ये डाव्या कालव्यातून आणि मे २०२३ मध्ये उजव्या कालव्यातून पाणी आले असते. मात्र सरकार बदलले आणि कामे थांबवली. तरीही आपणच पाठपुरावा केला. आज केलेल्या कामाचे समाधान होत आहे. या पाण्यामुळे पुढील अनेक पिढ्या समृद्ध होणार आहे.

पुनर्वसित शेतकरी, अधिकारी, कर्मचारी अनेकांनी खूप मदत केली. परंतु ज्यांनी विरोध केला ते आता पाणी सोडले असे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे. काम कोणी केले ते जनतेला माहिती आहे. मात्र स्थानिक काही खबरे निरोप देतात आणि चांगल्या कामात खोडा घातला जातो. नियतीने आपल्या हातून निळवंडे धरण करून घेतले आहे. या पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : छत्रपती संभाजीनगर, बीड, जालन्यात महायुतीच सरस

Solapur Assembly Election Result : सोलापूर जिल्ह्यात भाजपची सरशी

Maharashtra Vidhansabha Election Result : परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात महायुतीला घवघवीत यश

BJP Dominance : महाराष्ट्रावरील भाजपची मांड पक्की

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

SCROLL FOR NEXT