Nilwande Canal : ‘निळवंडे’च्या उजव्या कालव्याची कामे पूर्ण करा : आमदार थोरात

डाव्या कालव्यातून पाणी सोडावे उजव्या कालव्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे यासाठी कालव्यांचे जनक आमदार थोरात यांनी सातत्याने आग्रही मागणी केली होती.
Nilwande Dam
Nilwande Damagrowon
Published on
Updated on

Nagar : निळवंडे धरण हे उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी गावांसाठी बांधले गेले असून या भागात या वर्षी अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे पिके वाया गेली आहेत. या भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडावे व उजव्या कालव्याची कामे ही त्वरित पूर्ण करावी, अशी मागणी आमदार बाळासाहेब थोरात यांनी सरकारकडे केली. थोरात यांच्या मागणीला यश आले असून आज डाव्या कालव्यातून पाणी सुटले आहे, असा दावा केला.

Nilwande Dam
Nilwande Canal : निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडणार

डाव्या कालव्यातून पाणी सोडावे उजव्या कालव्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे यासाठी कालव्यांचे जनक आमदार थोरात यांनी सातत्याने आग्रही मागणी केली होती. याचबरोबर निळवंडे कृती समितीनेही १३ सप्टेंबर रोजी मोठे आंदोलन केले होते. यावर प्रशासनाच्या वतीने ३० सप्टेंबर रोजी पाणी सोडण्याचे आश्वासित केले गेले.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nilwande Dam
Nilwande Dam : निळवंडे धरणाच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन, अजित नवले जखमी

पुन्हा दहा ऑक्टोबर अशा तारखा दिल्या. आमदार बाळासाहेब थोरात व जनतेच्या रेटा यापुढे सरकार झुकले असून डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. उत्तर नगर जिल्ह्यातील १८२ दुष्काळी गावांत करिता आमदार थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा करून निळवंडे धरण व कालव्यांची कामे अगदी कोरोनाच्या संकटातही काम करून पूर्ण केली आहेत. मे महिन्यामध्ये भंडारदरा व निळवंडे दहा टीएमसी पाणी असल्याने डाव्या कालव्यातून पाणी सोडावे, अशी मागणी आमदार थोरात यांनी केली होती.

उजव्या कालव्याचे काम लवकर पूर्ण करावाढलेली महागाई, बेरोजगारी, दुष्काळाची छाया, जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न, रोजगार हमीच्या कामांचा प्रश्न, असे अनेक प्रश्न जनतेसमोर आहेत. दुष्काळग्रस्त गावांना पाणी मिळावे यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण मागणीला मोठे यश आले असून, आज प्रशासनाच्या वतीने डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. उजव्या कालव्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून टेस्टिंग करून सर्व गावांनाही त्वरित पाणी द्यावे अशी मागणी नेते आमदार थोरात यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सरकारकडे केली आहे.

- बाळासाहेब थोरात, आमदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com