PM Narendra Modi Agrowon
ॲग्रो विशेष

PM Narendra Modi : 'जनतेने ८० वेळा नाकारलेले आज संसदेचे कामकाज बंद पाडतायतं' पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

Parliament Winter Session 2024 : संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून (ता.२५) सुरू झाले आहे. जे २० डिसेंबरपर्यंत चालणार असून याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनातून देशाला संबोधित केले.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून (ता.२५) सुरू झाले असून आदानी आणि वक्फ विधेयकावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. पण याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. ज्यांना देशाने ८० वेळा नाकारले तेच आज संसद विस्कळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. संसदेत चांगली चर्चा व्हावी, अधिकाधिक लोकांनी संसदेत योगदान द्यावे, यासाठी अधिवेशन सुरळीत व्हावे असे आवाहन मोदींनी यावेळी केले आहे.

हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पीएम मोदींनी संसदेच्या संकुलात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांसह काँग्रेसचे नाव न घेता, निशाणा साधला. त्यांनी, आपल्याकडे काही असे लोक आहेत, जे सतत संसदेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांचा उद्देश संसदेचे कामकाज बंद पाडण्याचा आहे. हे लोक लोकशाहीत स्वतःचा उद्देश सफल करण्यासाठी धडपडत आहेत. पण त्यांना देशातील जनतेनेच ८० वेळा नाकारले आहे. देशातील जनता त्यांचे सर्व वर्तन पाहत असून अनेक वेळा यांना शिक्षाही केली आहे.

पण या लोकांना त्याचे काही वाटतं नाही. सर्वात वेदनादायक गोष्ट ही आहे की जे नवे खासदार नवीन कल्पना आणि नवी ऊर्जा घेऊन येतात, त्यांचे हक्क काँग्रेसवाले दडपत असल्याची टीका मोदींनी केली आहे.

काँग्रेसवाल्यांमुळे नव्या खासदारांना सभागृहात बोलण्याची संधीही मिळत नाही. लोकशाही परंपरेत येणाऱ्या पिढ्यांना तयार करणे हे प्रत्येक पिढीचे काम असून ज्यांना जनतेने सातत्याने नाकारले ते ना संसदेत चर्चा होऊ देतात आणि ना लोकशाहीच्या भावनेचा आदर करतात, असा टोला मोदींनी लगावला आहे.

काँग्रेससह विरोधकांना ना लोकांच्या आशा-आकांक्षांचे महत्त्व कळते, ना त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या कळतात. याचा परिणाम कधीच जनतेच्या अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाहीत. यामुळेच जनता त्यांना पुन्हा पुन्हा नाकारत असल्याचे मोदी म्हणाले.

तर विरोधी पक्षातील काही सहकारी अतिशय जबाबदारीने वागतात असून सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पडावे, अशी त्यांचीही इच्छा असते. परंतु विरोधक आणि विशेषत: काँग्रेसवाले आपल्याच सहकाऱ्यांचा आवाज दडपतात आणि त्यांच्या भावनांचाही अनादर करत असल्याचा दावा मोदींनी केला आहे.

२०२४ च्या निवडणुकीनंतर देशातील जनतेला आपापल्या राज्यांमध्ये आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली. त्यातही २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी अधिक बळ दिले आहे आणि राज्यांचा अधिक पाठिंबा वाढल्याचे मोदी म्हणाले.

दरम्यान संसदेच्या अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता असल्याने काँग्रेसने आधीच नोटीस दिली आहे. एकीकडे विरोधक अदानी आणि वक्फ विधेयकाच्या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निकालानंतर सरकारचा उत्साहही वाढला आहे. या अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयकासह १६ विधेयकांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladaki Bahin Yojana : महिलांच्या बँक खात्यावर दर महिन्याला १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये जमा होणार का?

Nanded Assembly Constituency : नांदेडमध्ये तीन नवख्यांना मिळाली आमदारकीची संधी

Agrowon Podcast : मका दरात काहिशी सुधारणा

Parliament Winter Session : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचा गदारोळ; लोकसभेसह राज्यसभेचं कामकाज २७ नोव्हेंबरपर्यंत तहकूब

Land Record Registration : गुंता इतर हक्क नोंदीचा

SCROLL FOR NEXT