Wheat Threshing Agrowon
ॲग्रो विशेष

Wheat Threshing : गहू पीक येतेय मळणीवर

Wheat Production : खानदेशात गहू पीक मळणीवर येत आहे. तसेच उशिरा लागवड केलेल्या पिकात दाणे पक्व होत असून, पीक बऱ्यापैकी चांगले आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात गहू पीक मळणीवर येत आहे. तसेच उशिरा लागवड केलेल्या पिकात दाणे पक्व होत असून, पीक बऱ्यापैकी चांगले आहे. गव्हाची पेरणी खानदेशात यंदा कमी झाली आहे. पेरणी सुमारे २१हजार हेक्टरवर झाली आहे. जळगाव जिल्ह्यात १८ ते १९ हजार हेक्टरवर पेरणी अपेक्षित होती.

परंतु पेरणी सुमारे तीन ते साडेतीन हजार हेक्टरने कमी झाली आहे. तर धुळे व नंदुरबारात सुमारे सात ते आठ हजार हेक्टरवर पेरणी अपेक्षित होती. परंतु या दोन्ही जिल्ह्यांतही पेरणी ३० टक्क्यांनी कमी झाली आहे.

गव्हाचे दर मागील हंगामात कमी होते. यंदाही दरांबाबत अपेक्षा नव्हती. कारण गहू मोफत रेशन दुकानांत उपलब्ध होतो. दुसरीकडे पाऊसमान कमी असल्याने अनेक भागात कूपनलिका, विहिरींचे जलसाठे कमी झाले. गव्हास पाणी अधिक लागते. तसेच खते व अन्य खर्चही अधिक आहे. यामुळे यंदा अनेकांनी गहू पेरणी टाळली आहे.

पेरणी तापी, गिरणा, अनेर नदीच्या लाभक्षेत्रात झाली आहे. अनेक शेतकरी परंपरेनुसार केळी पिकाच्या बेवडसाठी गहू पेरणी करतात. यामुळे पेरणीत मोठी घट जळगाव जिल्ह्यात झालेली नाही. परंतु अनेकांनी गव्हाचे क्षेत्र कमी केले. तर काहींनी गहू टाळून हरभरा व ज्वारीची पेरणी केली. जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, रावेर, पाचोरा या भागात गहू पेरणी बऱ्यापैकी आहे. परंतु अन्य भागात पेरणी कमी किंवा अल्प आहे. धुळ्यात शिरपूर आणि नंदुरबारात शहादा व तळोदा तालुक्यात गहू पीक आहे.

वेळेत पेरणीचा गहू पक्व

वेळेत किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या, दुसऱ्या आठवड्यात पेरणी केलेल्या गहू पिकात दाणे पक्व होऊन ते मळणीवर आले आहे. दाणे कडक झाल्याने त्याचे सिंचन बंद करावे लागले आहे. कारण सिंचन पाट पद्धतीने केले जाते. त्यात सध्या वेगाचा वारा व पावसाळी वातावरण आहे. यात पीक आडवे होण्याची शक्यता अधिक असते.

पुढील आठवड्यात खानदेशात गव्हाची मळणी सुरू होईल. उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकात दाणे पक्व होत आहेत. काही भागात जानेवारीतही पेरणी झाली असून, काहींचे पीक अद्याप निसवलेले नाही. अशा स्थितीतील पिकास आणखी दोन वेळेस पाणी द्यावे लागेल. यामुळे खानदेशात गव्हाची मळणी व आवक एप्रिलपर्यंत सुरू राहील, असेही दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Jowar Seed Scheme: रब्बी ज्वारी मिनीकिटसाठी नोंदणी करा; कृषी विभागाचे आवाहन

Wetland Ecosystems: पाणथळ सृष्टी व्यवस्थेचे विश्व

Interview with Jaykumar Gore: दुष्काळमुक्ती अन् रोजगारनिर्मितीस प्राधान्य

Spider Mite Issue: वांग्यावरील लाल कोळीची समस्या

Microgreen Farming: नेदरलँड्समधील मायक्रोग्रीन शेती

SCROLL FOR NEXT