Parbhani News : परभणी जिल्ह्यात २०२२-२३ मध्ये पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतील सूक्ष्म सिंचन घटकांतर्गंत ठिबक व तुषार संचाचे मिळून ६ हजार ६७१ लाभार्थी शेतकऱ्यांना ११ कोटी ७७ लाख १४ हजार ३७४ रुपये एवढे अनुदान वाटप करण्यात आले आहे. अजून २२६ शेतकऱ्यांचे अनुदान अद्याप प्रलंबित आहे.
पंतप्रधान कृषी सिंचन योजना (पर ड्रॉप मोअर क्रॉप) सूक्ष्म सिंचन घटकाअंतर्गंत ठिबक व तुषार संच खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते.त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर आलेल्या अर्जातून सोडत पध्दतीने लाभार्थी शेतकऱ्यांची निवड केली जाते. या अंतर्गंत २०२२-२३ या वर्षी अनुदानासाठी सोडत काढून जिल्ह्यातील २३ हजार ३९७ शेतकऱ्यांच्या अर्जांची निवड करण्यात आली होती.
त्यापैकी १ हजार ५९ अर्ज नाकारण्यात आले तर १५ हजार ३९३ अर्ज रद्द करण्यात आले.एकूण ६ हजार ९४५ अर्ज अनुदान वाटपाच्या प्रक्रियेत असून या सर्व अर्जदार शेतकऱ्यांनी ठिबक,तुषार संच खरेदी बाबतचे कागदपत्रे पोर्टलवर अपलोड केली आहेत.६ हजार ९४४ शेतकऱ्यांनी खरेदीच्या पावत्या अपलोड केल्या आहेत.
त्यापैकी ६ हजार ९२६ शेतकऱ्यांच्या अर्जाची छाननी पूर्ण झाली आहे.२६ शेतकऱ्यांचे मोजमाप पुस्तिका पू्र्ण करण्याची राहिली आहे.पडताळणीनंतर एकूण ६ हजार ९०० शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात संमती देण्यात आली आहे.३ शेतकऱ्यांचे बँक खात्याचा तपशिल चुकीचा असल्यामुळे अनुदान वितरणास अडचण येत आहे.एकूण ६हजार ६७१ शेतकऱ्यांना ११ कोटी ७७ लाख १४ हजार ३७४ रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
सूक्ष्म सिंचन अनुदान वितरण स्थिती
(रक्कम कोटी रुपये)
तालुका प्रलंबित शेतकरी अनुदान प्राप्त शेतकरी अनुदान रक्कम
परभणी २७ ९७० १.४४७६
जिंतूर ६६ १६१५ २.३६२३
सेलू ९४ ८४३ १.४०७८
मानवत ८ ९१४ २.१७४९
पाथरी २ ४१६ १.१७२०
सोनपेठ १ २०१ ०.३३६४
गंगाखेड ६ ४५१ ०.६५८३
पालम १४ ६०५ १.२२६३
पूर्णा ८ ६५६ ०.९८५२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.