Water Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage : भूममधील विहिरींनी गाठला तळ

Water Crisis : तालुक्यात वाढत्या बाष्पीभवनामुळे विहिरींसह विविध प्रकल्पांतील पाण्याच्या पातळीत कमालीची घट होऊ लागली आहे. तालुक्यात नऊ लघु प्रकल्प, तीन मध्यम प्रकल्प आणि चार साठवण तलाव आहेत.

Team Agrowon

Bhum News : तालुक्यात वाढत्या बाष्पीभवनामुळे विहिरींसह विविध प्रकल्पांतील पाण्याच्या पातळीत कमालीची घट होऊ लागली आहे. तालुक्यात नऊ लघु प्रकल्प, तीन मध्यम प्रकल्प आणि चार साठवण तलाव आहेत.

या प्रकल्पांपैकी दोन लघु आणि दोन मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडलेले आहेत. तर बाणगंगा मध्यम प्रकल्पाशिवाय अन्य सर्व प्रकल्पांतील पाणीसाठा ५० टक्क्यांखाली गेला आहे. त्यामुळे प्रकल्प परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

यावर्षी परतीचा पाऊस झाल्याने तालुक्यातील नदी, नाले वाहून तलावांमध्ये जेमतेम पाणीसाठा झाला. मात्र, फेब्रुवारीतच उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पाण्याची पातळी झपाट्याने घटत आहे. गेल्या वर्षी बहुतेक तलावात मुबलक पाणी होते. परंतु, यंदा पाऊस कमी झाला आणि आता बाष्पीभवनामुळेदेखील विहिरींनी आतापासूनच तळ गाठला.

पाण्याअभावी पिके करपू लागली

विहिरीत उपलब्ध पाणीसाठ्यावर ठिबक सिंचनाच्या साहाय्याने कांदा, गहू, ऊस, ज्वारी, हरभरा लागवड केली. परंतु, जानेवारीच्या अखेरीस उन्हाचा तडाखा वाढल्याने व विहिरींनीही तळ गाठल्याने रब्बी हंगामातील पिकेही पाण्याअभावी करपू लागली आहेत. पिण्याच्या पाण्यासह जनवारांच्या चारा-पाण्याचाही प्रश्न गंभीर होऊ लागला आहे.

तलावातील सध्याचा पाणीसाठा (टक्के)

घुलेवाडी लघु प्रकल्प १७.२९

गिरलगाव लघु प्रकल्प ५६.८३

पाथरूड लघु प्रकल्प १२.६३

बागलवाडी लघु प्रकल्प ३५.३४

जाम लघु प्रकल्प २९.७६

तिंत्रज लघु प्रकल्प ८.५३

आरसोली लघु प्रकल्प १९.०७

कुंथलगिरी लघु प्रकल्प ४२.१५

वाकवड लघु प्रकल्प ३८.६१

चार प्रकल्प कोरडेठाक

बाणगंगा मध्यम प्रकल्प ७०.२४ पाणीसाठा शिल्लक असून तालुक्यातील हिवर्डा, गोरमाळा हे लघु प्रकल्प व रामगंगा, संगमेश्वर हे मध्यम प्रकल्प कोरडे पडलेले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT