Weed Agrowon
ॲग्रो विशेष

Weed Control : यंदा पिकांमध्ये फवारणी केल्यानंतरही तण जिवंतच

Weedicide : तणनाशकांना बाजारपेठेत असलेली मागणी पाहत अनेक कंपन्या रिंगणात उतरल्या आहेत. मात्र, यंदा अनेक शेतकऱ्यांनी फवारणी केल्यानंतरही तण तसेच उभे आहे.

Team Agrowon

Akola News : तणनाशकांना बाजारपेठेत असलेली मागणी पाहत अनेक कंपन्या रिंगणात उतरल्या आहेत. मात्र, यंदा अनेक शेतकऱ्यांनी फवारणी केल्यानंतरही तण तसेच उभे आहे. शिवाय फवारणी क्षेत्रातील पिकांची वाढही होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत.

तणनाशकांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारींचा सूर गावोगावी उमटू लागला आहे. कृषी विभागाकडेही याबाबत लेखी तक्रारी शेतकरी देत आहेत. तर कंपन्यांचे विक्री प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन ही प्रकरणे जागेवर मिटवण्याचा प्रयत्नसुद्धा करीत आहेत.

निंदणाचा खर्च वाचण्यासाठी तसेच पीक तणमुक्त करण्यासाठी मागील काही वर्षात तणनाशकांचा वापर वाढला. किटकनाशकांप्रमाणेच तणनाशकांचीही एक मोठी बाजारपेठ तयार झाली आहे. हंगामाच्या तोंडावर विविध कंपन्यांकडून तणनाशकांच्या जाहिरातींचा भडीमार शेतकऱ्यांवर केला जातो. यामुळे कुठले तणनाशक वापरावे याचा संभ्रमही अनेकदा तयार होत असतो.

या वर्षी अनियमित पावसाने पेरण्याही भिन्न कालावधीत झालेल्या आहेत. यामुळे पिकांची अवस्था वेगवेगळी आहे. गेल्या काही दिवसात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सातत्याने होत असल्याने पिकांमध्ये तणांचे प्रमाण वाढले.

त्यामुळे तणनियंत्रणासाठी शेतकरी तणनाशकांची फवारणी करत आहेत. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात तणनाशके उपलब्ध असून विक्रेत्यांच्या सल्ल्‍याने शेतकरी त्याची खरेदी करून फवारत आहेत.

या हंगामात तणनाशकांचा प्रभाव होत नसल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत. जळगाव जामोद तालुक्यात माहुली गावातील शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे एका नामांकित कंपनीच्या तणनाशकाबाबत तक्रार दिली आहे.

सोयाबीन, तूर पिकात फवारणी करून १५ दिवसाचा कालावधी झाल्यावरही तण हिरवेगार उभे आहे. त्यामुळे तणनाशकाचा कुठलाच प्रभाव दिसून आलेला नाही, असे त्यात म्हटले आहे. कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करीत कृषी विभागाच्या गुणनियंत्रण अधिकाऱ्यांकडून तपासणीची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Uddhav Thackeray On Farmers: मोदींना विदेशाची पर्वा, शेतकऱ्यांचं काय? उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

Dam Water Discharge : भंडारदरा, निळवंडे धरणांतून विसर्ग सुरू

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा प्रकरणी सीएससी चालकांविरुद्ध गुन्हा

Soybean Seed Rejection : सोयाबीनचे ५३ हजारांवर क्विंटल बियाणे नापास

Maharashtra Farmer Issue: संत्रा बागांवरील फायटोप्थोरा नुकसानीबाबत मदतीची मागणी

SCROLL FOR NEXT