Girna dam  Agrowon
ॲग्रो विशेष

Girna Dam Water : गिरणा धरणातील पाणीसाठा शंभरीनजीक

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्यास वरदान ठरणाऱ्या गिरणा नदीवरील गिरणा धरणातील जलसाठ्यात मागील तीन-चार दिवसांत मोठी वाढ झाली आहे. मागील शुक्रवारी (ता. २३) धरणात सुमारे ४८ टक्के जलसाठा होता. तीन दिवसांत गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार ते अतिजोरदार पाऊस झाल्याने गिरणा धरणातील जलसाठा मंगळवारी (ता. २७) सकाळी ९० टक्क्यांवर पोहोचला.

गिरणा धरणानजीकच्या गावांत सतर्कतेचा इशारा देण्यात आला. गिरणा धरण भौगोलिकदृष्ट्या नाशिकमधील नांदगाव तालुक्यात आहे. या धरणाची साठवणक्षमता १८ टीएमसी आहे. या धरणात या महिन्यात सुरुवातीला व आता अखेरीस पाण्याची चांगली आवक झाली. मागील वर्षी कमी पावसाने हे धरण फक्त ५६ टक्के भरले होते.

परंतु यंदा पावसाचा पूर्ण एक महिना राहिलेला असतानाच या धरणातील जलसाठा आश्‍वासक स्थितीत पोहोचला आहे. यामुळे धरणातून पुढे रब्बीसाठी पाणी मिळेल, अशी अपेक्षा आहे. गिरणा पट्ट्यात २१ हजार हेक्टर क्षेत्रातील रब्बीला या धरणातून पाणी दिले जाते. मागील वेळेस जलसाठा कमी असल्याने पिण्यासह उद्योगांसाठी या धरणाचे पाणी राखीव करण्यात आले होते. यंदा मात्र रब्बीला पाणी मिळेल, याची खात्री झाली आहे.

गिरणा धरणासह या नदीवर नाशिक जिल्ह्यात केळझर, पुनद, ठेंगोळा बंधारा, चणकापूर, हरणबारी आदी प्रकल्प आहेत. या प्रकल्पांतून गिरणा धरणात पाण्याची मोठी आवक सोमवारी (ता. २६) सुरू होती. मंगळवारीदेखील ही आवक सुरू होती. परंतु आवक काहीशी कमी झाली. कारण पावसाचा जोर ओसरला.

धरणातील साठ्यामुळे टंचाई दूर

गिरणा धरण पश्‍चिम भागासाठी महत्त्वाचे आहे. चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव या भागांत या धरणातून रब्बीसाठी पाणी दिले जाते. तसेच १०० पेक्षा अधिक गावे, चाळीसगाव, पाचोरा व भडगाव शहरासही या धरणातून पाणी दिले जाते. गिरणा धरणातील साठ्यामुळे पुढे कुठलीही टंचाई या भागात राहणार नसल्याचेही यानिमित्त स्पष्ट झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Retreating Monsoon : परतीचा पाऊस -हवी अधिक स्पष्टता

PDKV : ‘पंदेकृवि’चा चेहरामोहरा बदलतोय

Bribery Case : महा-ई-सेवा केंद्रचालक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

PDKV Shiwarferi : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शिवारफेरीला प्रारंभ

Soybean Cotton Subsidy : सोयाबीन, कापूस अनुदानासाठी ९१ लाख हेक्टर पात्र

SCROLL FOR NEXT