Devna Irrigation Project Agrowon
ॲग्रो विशेष

Irrigation Project : जिगाव, नदीजोडमुळे गावे पाणीदार होणार

River Linking Project : शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला जिगाव सिंचन प्रकल्प वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे. हा प्रकल्प आणि वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पांमुळे खामगांवमधील गावे पाणीदार होणार आहेत.

Team Agrowon

Buldana News : शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला जिगाव सिंचन प्रकल्प वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे. हा प्रकल्प आणि वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पांमुळे खामगांवमधील गावे पाणीदार होणार आहेत. लवकरच शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी येईल, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

येथे कोट्यवधींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण रविवारी (ता. ६) फडणवीस यांच्या यांच्याहस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आ. डॉ. संजय कुटे, आ. आकाश फुंडकर व इतर व्यासपीठावर उपस्थित होते.

फडणवीस पुढे म्हणाले की, २०१४ साली जिगाव प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात चालना दिली. धरण बांधण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाइपलाइनने पाणी नेवून शेतकऱ्याला थेट बांधावर पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. आज ७ हजार कोटी रुपये जिगाव प्रकल्पासाठी दिले. त्याचे काम अतिशय वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे.

खामगांव विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाइपलाइनने पाणी येणार आहे. यासोबतच नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण अनुदानावर ठिबकद्वारे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कोरडवाहूचा शिक्का पूर्णपणे पुसला जाईल आणि बागायती भाग म्हणून ओळखता येईल, असेही ते म्हणाले.

दरम्यान जिगाव प्रकल्पाचे पाणी आरक्षण मिळावे, अशी मागणी आमदार आकाश फुंडकर यांनी केली होती. त्याअनुषंगाने पुढील ५० वर्षे खामगांवला पाणी पुरेल इतके पाणी आरक्षण मंजूर केल्याचे जाहीर केले. यापुढे पाणीटंचाई भासणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.

‘१० लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येईल’

वैनगंगा-नळगंगा नदीजोड हा ९० हजार कोटींचा प्रकल्प आहे. नद्यांचे पाणी भंडाऱ्यापासून बुलडाणा जिल्ह्यापर्यंत आणणार आहोत. १० लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येईल. या प्रकल्पाच्या कामांची सुरुवात केली असून त्याचा फायदा खामगाव तालुक्याला होणार आहे. १०० टक्के सिंचनाखाली असलेला खामगांव तालुका अशी ओळख होईल. तालुक्यातील पांदण रस्त्यांसाठी मार्चच्या बजेटमध्ये २५ कोटी देणार असल्याचेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief: मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने मदत द्या

Exam Stress Relief : परीक्षा जवळ आलीये अन् टेन्शन वाढलंय? 'या' सोप्या टिप्सने ताण होईल छुमंतर!

Women Farmers Contribution: मोरोक्कोच्या बहरलेल्या शेतीतील अदृश्य हात

Interview With Rakesh Kaithwas : शेतकरी कंपन्यांच्या बळकटीकरणातून मूल्यवर्धनाला चालना

Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

SCROLL FOR NEXT