Ujani Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Dam : उजनीतून सोडलेले उजव्या कालव्याचे पाणी बंद

Ujani Dam Canal Water Off : ४० टीएमसी पाणी आगामी पावसाळ्यापर्यंत पुरवायचे आहे. त्यामुळे शेतीसाठी सोडलेले उजव्या कालव्याचे पाणी गुरुवारी (ता. ८) बंद करण्यात आले आहे.

Team Agrowon

Solapur News : उजनी धरणातील पाणीसाठा सध्या उणे ११ टक्क्यांपर्यंत आला असून, धरणातील मृतसाठा ५८ टीएमसी आहे. मृतसाठ्यात अंदाजे १८ टीएमसी गाळ असून, उर्वरित ४० टीएमसी पाणी आगामी पावसाळ्यापर्यंत पुरवायचे आहे. त्यामुळे शेतीसाठी सोडलेले उजव्या कालव्याचे पाणी गुरुवारी (ता. ८) बंद करण्यात आले आहे.

जिल्ह्यात यंदा दुष्काळी स्थिती असून माढा, बार्शी, करमाळा, माळशिरस व सांगोला या पाच तालुक्यांत यापूर्वीच दुष्काळ जाहीर झाला आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश स्थिती आहे. भूजल सर्वेक्षणानुसार जमिनीची पाणीपातळी एक मीटरने खालावली असून, यंदा काही तालुक्यांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.

संभाव्य पाणी संकटाचा अंदाज घेऊन मोहोळ तालुक्यातील आष्टी तलावात पुढील तीन दिवस पाणी सोडले जाणार आहे. सध्या या तलावात ३० टक्के पाणी आहे. त्यानंतर १५ फेब्रुवारीपर्यंत उजनीतून सोडलेले डाव्या कालव्याचेही पाणी पूर्णत: बंद केले जाणार आहे.

धरण उणे २० टक्के होईपर्यंत कॅनॉलमधून पाणी सोडता येते. त्यानंतर पाणी कॅनॉल, बोगदा, उपसा सिंचनमधून अपेक्षित वेगान जात नाही. त्यामुळे सध्याचे आवर्तन शेतीसाठी शेवटचे होते. आता शेतकऱ्यांना पावसाळ्यापर्यंत उजनीतून पाणी मिळणार नाही.

सोलापूर, धाराशिव, कर्जत-जामखेड, बारामती, इंदापूर या शहरांसह एमआयडीसी व सोलापूर जिल्ह्यातील १०० हून अधिक गावांचा पाणीपुरवठा उजनीवर अवलंबून आहे. धरणातील पाणी आता पिण्यासाठीच राखीव असणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

SCROLL FOR NEXT