Ladki Bahin Yojana  Agrowon
ॲग्रो विशेष

Ladki Bahin Yojana : बँक कर्मचाऱ्यांनी उपसले लाडकी बहीण योजनेच्या विरोधात संपाच हत्यार; १६ नोव्हेंबर रोजी संपाची घोषणा

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यात निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह मुख्यमंत्री ‘योजनादूत’ योजनेला स्थगिती देण्यात आली आहे. यादरम्यान आता नवे संकट सरकारच्या समोर उभे झाले आहे. राज्यातील युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून १६ नोव्हेंबर रोजी संप करण्याचे ठरवले आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनतेला समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.

सध्या राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला ब्रेक लागला असून याच योजनेवरून बँक कर्मचाऱ्यांनी बंड केले आहे. बँक कर्मचाऱ्यांनी १६ नोव्हेंबर रोजी संपाची घोषणा केली आहे. तर या योजनेमुळे बँकेत सुरक्षित वातावरण मिळत नसल्याचं बँक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांकडून बँक कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की आणि मारहान केली जात आहे. याआधी नाशिकमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ बडोदाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला योजनेच्या लाभार्थ्यांकडून झाला होता. याचा निषेध म्हमून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (९ बँकेचे युनियन) अर्थात यूएफबीयूने १६ नोव्हेंबर २०२४ रोजी लाक्षणिक संपाची घोषणा केली आहे. तसेच बँक कर्मचाऱ्यांना पुरेसे संरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे.

यावेळी यूएफबीयूचे राज्य समन्वयक देवीदास तुळजापूरकर यांनी संप पुकारण्या मागचे कारण सांगताना, या योजनेमुळे बँकांमध्ये गोंधळ उडत आहे. काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून सेवा शुल्क कापलं गेलं आहे. मात्र हे शुल्क बँकांनी नियमानुसार आकारलं आहे. यावरून खातेधारक आणि बँक कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची होत आहे. यातभर म्हणून स्थानिक नेते यात अधिक वाद निर्माण करून कर्मचाऱ्यांना धमकावत आहेत. असाच प्रकार नाशिकमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ बडोदाच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत झाला आहे.

सध्या या योजनेला स्थगिती मिळाली असली तरीही योजनेचा गोंधळ कमी झालेला नाही. यामुळे सरकारने बँकांना सुरक्षा आणि अतिरिक्त कर्मचारी देण्याची गरज आहे. ती याआधी देखील दिली नाही. योग्य नियोजन केले नाही किंवा संवादल ठेवला नाही. सरकारमध्ये संवादाचा अभाव असल्याने या योजनेमुळे बँक कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण तुळजापूरकर यांनी म्हटले आहे.

बीड, जालना, लातूर, धुळे, पुणे जिल्ह्यात या योजनेवरून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची मोठी गर्दी होते. येथे बँक खातं चालू करणं, ते आधार लिंक करणं आणि बंद पडलेली बँक खाती पुन्हा सुरू करण्यातच बँक कर्मचाऱ्यांचा वेळ जात आहे. यातून जर का पैसै कट झाले की बँक कर्मचाऱ्यांवर हल्ले केले जात आहेत. असे राज्यात अनेक ठिकाणी प्रकार घडले असून याचा निषेध करण्यासाठी १६ नोव्हेंबर २०२४ रोजी लाक्षणिक संपाची घोषणा केल्याची माहिती तुळजापूरकर यांनी दिली आहे.

या घोषणेनंतर कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी, बँक यूनियनने कोणतंही कठोर पाऊल उचलण्याआधी सरकारशी चर्चा करावी, असे आवाहन केले आहे. तसेच सरकार बँक कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यास तयार असून अतिशय लोकप्रिय असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी करण्यासाठी बँकांनी सहकार्य करावे असेही सावे यांनी म्हटलं आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Claim : विम्यासाठी योग्य नुकसानीच्या पूर्वसूचना कशा द्यायच्या? योग्य पर्याय कसे निवडायचे?

Samruddhi Train : शेतीमाल पार्सलसाठी शेतकऱ्यांची गर्दी

Soybean Procurement : सोयाबीनमधील ओलाव्यामुळे हमीभावाने खरेदीसाठी अडचणी

Crop Insurance : शेतकऱ्यांना विक्रमी पीकविमा

Heavy Rain : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील चार मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT